Home /News /national /

'हिंदूस्तान हिंदूस्तान आहे'; तालिबानमधून सुटका झालेल्या निदान सिंह यांनी सरकारचे मानले आभार

'हिंदूस्तान हिंदूस्तान आहे'; तालिबानमधून सुटका झालेल्या निदान सिंह यांनी सरकारचे मानले आभार

तालिबानी दहशतवाद्यांनी गुरुद्वाऱ्यातून निदान सिंह यांचं अपहरण केलं होतं

    नवी दिल्ली, 26 जुलै : अफगणिस्तानात हिंदू आणि शीख समुदायाचे नेता निदान सिंह सचदेव यांची सुटका झाल्यानंतर भारतात परतले आहेत. निदान सिंह यांच्यासह 11 जण शीखांच्या विशेष फ्लाइटने काबुलहून दिल्लीला आले आहेत. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या सर्वांचे स्वागत करण्यात आले. 22 जून रोजी अफगणिस्तानातील पकटिया प्रांतातील चमकानी जिल्ह्यातील तालिबानी दहशतवाद्यांनी गुरुद्वाऱ्यातून त्यांचं अपहरण केलं होतं. अफगान नागरिक निदान सिंह सचदेवा यांचं कुटुंब दिल्लीत आहे आणि 3 महिन्यांपूर्वी ते अफगणिस्तानला गेले होते. परराष्ट्र मंत्रालयाकडून गुरुवारी निदान सिंह यांच्या सुटकेनंतर सांगण्यात आले की, अफगणिस्तानमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदू आणि शीखांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे भारत अशा समुदायाला विशेष व्हिसा उपलब्ध करुन देत आहे, ज्यामुळे ते भारतात येऊ शकतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की भारतात येऊ इच्छिणाऱ्यांना येथे आल्यानंतर तपास केला जाईल आणि नियमांनुसार पाऊले उचलली जातील. यावेळी निदान सिंह यांनी भारत सरकारने धन्यवाद मानले. एएनआयशी केलेल्या बातचीतनुसार त्यांनी आपल्या मातृभूमीत परत आणल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले - हिंदूस्तानाबद्दल काय म्हणू त्याला माझी आई म्हणू की बाबा..माहिती नाही पण हिंदूस्तान हिंदूस्तान आहे, अशा शब्दान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Talibani

    पुढील बातम्या