देशावर दहशतवादी हल्ल्याचा मोठा धोका; NIAने दिला महाराष्ट्राला दिला अलर्ट!

देशावर दहशतवादी हल्ल्याचा मोठा धोका; NIAने दिला महाराष्ट्राला दिला अलर्ट!

राष्ट्रीय तपास यंत्रणे(NIA)ने सोमवारी देशावर असलेल्या दहशतवादाच्या कटाची माहिती दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: राष्ट्रीय तपास यंत्रणे(NIA)ने सोमवारी देशावर असलेल्या दहशतवादाच्या कटाची माहिती दिली. जमात-उल-मुजाहिदीन (JMB)सारख्या दहशतवादी संघटना बंगालपासून काश्मीर आणि काश्मीरपासून केरळपर्यंत दहशतवादी हल्ल्याच्या प्रयत्नात आहेत. दहशतवाद विरोधी पथकांच्या सर्व राज्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत NIAने ही माहिती दिली आहे.

या बैठकीत बोलताना NIAचे महासंचालक व्हाय.सी.मोदी यांनी सांगितले की, जमात-उल-मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटना झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये बांगलादेशमधील प्रवाशांच्या आडून दहशतवादी कृत्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या काही दिवसात NIAने ISकनेक्शन संबंधित पकडलेल्या 127 जणांना अटक केली होती. हे सर्व जण झाकीर नाईकच्या भाषणाने प्रभावित झाल्याचे मोदी यांनी सांगितले. त्याच बरोबर पाकिस्तानकडून पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तान दहशतवाद्यांना मदत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पाकिस्तान खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने पंजाबमध्ये दहशत पसरवणार आहे. जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्ताकडून फंड मिळत असल्याचे ते म्हणाले.

श्रीलंका चर्च हल्ला...

NIA आयजी आलोक मित्तल म्हणाले, तामिळनाडू आणि केरळमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींनी जहरान हाशमीचे व्हिडिओ आणि ऑडिओ भाषण ऐकले होते. जहरान हाच श्रीलंकेतील चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. सीरियातील दहशतवादी संघटना ISISशी संबंधित अटक करण्यात आलेल्या 127 पैकी 33 जण तामिळनाडूतील, 19 जण उत्तर प्रदेश, केरळमधील 17, तेलंगणामधील 14 जणांचा समावेश आहे. या सर्वांनी चौकशी दरम्यान झाकीर नाईकची ऑडिओ क्लिप ऐकल्याचे मित्तल म्हणाले.

JMB नेटवर्क मोडलं

म्यानमारमधून पळालेल्या रोहिंग्या मुस्लिमांनी जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून भारताविरोधी कारवाई सुरु केल्याचा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला. ऑक्टोबर 2014मध्ये बर्धमान प्रकरणात JMBचे पहिले कनेक्शन सापडले. या चौकशी दरम्यान JMBचे बांगलादेशमधील प्रमुख 2007पासून भारतात येत असल्याचा खुलासा झाला होता. या बैठकीत NIAने JMBच्या नेतृत्वाच्या संपर्कात असणाऱ्या 125 जणांची यादी सर्व दहशतवाद विरोधी पथकांकडे सोपवली आहे. या बैठकीस देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल देखील उपस्थित होते.

Published by: Akshay Shitole
First published: October 14, 2019, 2:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading