बंगळुरू 9 जुलै : NIAने धाडसी कारवाई करत बंगळुरूमध्ये छापा टाकून दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला. अटकेतल्या दहशतवाद्यांकडून NIA काही खळबळजनक माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारी NIAने काही ठिकाणांवर छापे घातले आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. त्यात हँडग्रेनेड IED स्फोटकांसह टायमर आणि इतर साहित्य जप्त केलं.
NIAने काही दिवसांपूर्वी जमात उल मुजाहीद्दीन बांगलादेशचा दहशतवादी हबीबूर रहेमान याला अटक केली होती. रहेमानने पोलिसांच्या चौकशीत अनेक खळबळजनक माहिती सांगितली होती. त्या माहितीच्या आधारे NIAने ही कारवाई केली. यात 5 देशी हँडग्रेनेड, IED आणि रॉकेट्स बनविण्याचं सामान टायमरचा साठाच जप्त केला. सोलादेवन हिल्स या परिसरातल्या एका घरातून हे साहित्य जप्त करण्यात आलंय. या प्रकरणात काही जणांना NIAने ताब्यातही घेतलं आहे.
'राज ठाकरे काँग्रेससोबत गेले तर मनसेचं मोठं नुकसान'
पाकिस्तान 'कारगिल'सारखं धाडस पुन्हा करणार नाही
भारत आता खूप बदललाय, पाकिस्तानने 1999मध्ये कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचं जे धाडस केलं. आता पुन्हा ते धाडस करण्याची हिंम्मत पाकिस्तान करणार नाही असं मत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केलंय. याचं कारण म्हणजे असं केलं तर काय होतं याचा धडा पाकिस्तानला मिळाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा अशी मुजोरी करणार नाही असंही ते म्हणाले.
'ऑपरेशन विजय'ला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रावत म्हणाले, आता भारताची दक्षता कमालीची वाढलीय. सीमेवरच्या प्रत्येक भागावर आमची नजर असते. भारताची शस्त्र सज्जताही वाढली आहे. असा आगावूपणा केला तर काय होऊ शकतं हे आम्ही पाकिस्तानला दाखवून दिलं आहे असंही ते म्हणाले.