S M L

काश्मीर आणि नवी दिल्लीत फुटीरवादी नेत्यांच्या घरावर NIAचे छापे

एनआयएनं आज काश्मीर आणि नवी दिल्लीत एकूण २१ ठिकाणी धाडी टाकल्या. काश्मीरमधले फुटीरवादी नेते आणि हवाला ट्रेडर्सच्या घरांवर हे छापे पडले आहेत.

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2017 05:45 PM IST

काश्मीर आणि नवी दिल्लीत फुटीरवादी नेत्यांच्या घरावर NIAचे छापे

03 जून : एनआयएनं आज काश्मीर आणि नवी दिल्लीत एकूण २१ ठिकाणी धाडी टाकल्या. काश्मीरमधले फुटीरवादी नेते आणि हवाला ट्रेडर्सच्या घरांवर हे छापे पडले आहेत.

काश्मीरमध्ये असंतोष पसरवण्यासाठी पाकिस्तानातून पैसा या फुटीरवाद्यांना पाठवला जातो आणि त्यामुळे दगडफेकीच्या घटना वाढतात, असा भारत सरकारचा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यात ३ फुटीरवादी नेत्यांची एनआयएनं चौकशी केली होती. पाकिस्तानमध्ये एक तथाकथित सामाजिक संस्था आहे. फलाह ए इन्सानियत असं तिचं नाव. संस्थेचे लोक पाक नागरिकांकडून समाज सेवेसाठी पैसा गोळा करतात, आणि तो पैसा भारतात वळवतात अशी माहिती गुप्तचर खात्यांना मिळालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 05:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close