नवी दिल्ली, 08 ऑगस्ट: भारतविरोधी कारवायांत (Anti India Activities) सामील असणाऱ्या संशयातून एनआयएने (NIA) जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashamir) मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) रविवारी पहाटे जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी सुमारे 50 हून अधिक ठिकाणी छापे (Raid at 50 Location) टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेपासून काश्मीरसह जम्मू विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये जमात-ए-इस्लामीशी (Jammat-e-Islami) संबंधित संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यालयांमध्ये आणि घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. ही कारवाई अद्याप सुरूच आहे.
रविवारी पहाटे पाचच्या सुमारास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं जम्मू -काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांसह वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असलेल्या लोकांच्या घरांवर ही छापेमारी केल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.
National Investigation Agency (NIA) is conducting raids at multiple locations in Jammu and Kashmir related to a terror funding case Visuals from Anantnag district pic.twitter.com/IICd81bJ5Y
— ANI (@ANI) August 8, 2021
हेही वाचा-पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच सडणार, आतंकवादी मसूद अजहरबाबत ठोस पुरावा हाती
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरसह जम्मू विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये जमात-ए-इस्लामीशी संबंधित संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यालये आणि घरांवर ही कारवाई करण्यात येत आहे. या छापेमारीत एनआयएने डिजिटल पुराव्यांसह अन्य कागदपत्रंही जप्त केले आहेत.
हेही वाचा-अफगाणी सैन्याची मोठी कारवाई, 24 तासांत 300 तालिबानींचा खात्मा
काही दिवसांपूर्वी एनआयएने स्वतःच्या अहवालावर अधारित जमात-ए-इस्लामीच्या विरोधात एक गुन्हा दाखल केला होता. एनआयएचे 5 एसपी आणि जवळपास 150 अधिकारी या छाप्यात सामील झाले आहेत. किश्तवाड, डोडा, रामबन, राजौरी, बारामुल्ला, पुलवामा, अनंतनाग, शोपियां, कुलगाम, बडगाम आणि श्रीनगर याठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणांची कसून तपासणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu kashmir, Nia, Raid