मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्ली-यूपीमध्ये पकडलं गेलं ISISचं नवं मॉड्यूल, निशाण्यावर होतं RSS ऑफिस

दिल्ली-यूपीमध्ये पकडलं गेलं ISISचं नवं मॉड्यूल, निशाण्यावर होतं RSS ऑफिस

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 16 ठिकाणी छापे टाकले  आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या जाफराबाद आणि उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये ISIS संघटनांशी संपर्कात असलेल्या ठिकाणांवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 16 ठिकाणी छापे टाकले  आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या जाफराबाद आणि उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये ISIS संघटनांशी संपर्कात असलेल्या ठिकाणांवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यात मोठ्या सर्च ऑपरेशनमध्ये NIA व्यतिरिक्त उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी संघटनांचादेखील सहभाग होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस मुख्यालय आणि दिल्लीतल्या RSS ऑफिससह अनेक मोठ्या जागा  दहशतवादी संघटनांच्या रडारवर होत्या.

हेही वाचा - सावधान! नववर्षाआधी मुंबईत मोठ्या दहशवादी हल्ल्याचा कट, न्यूज18च्या हाती EXCLUSIVE डिटेल्स

ISIS ची नवं मॉडेल समजल्या जाणाऱ्या 'हरकत उल हर्ब ए इस्लाम' या संघटनेशी संपर्कात असलेल्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणात 5  संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याविषयी अधिक तपशील देण्यासाठी NIA बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहे.

दरम्यान, भारतीय सुरक्षा यंत्रणा सध्या हायअलर्टवर आहे. मागच्या आठवड्यात दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवादी जाकिर मूसाला वगळता त्याच्यासोबत असणाऱ्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

VIDEO : ...अन् मुख्यमंत्र्यांनी आमदाराकडून खेचला माईक

First published:

Tags: Delhi news, Nia, Terrorism, Uttar pradesh news