देशभर बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला

देशभरातली महत्त्वाची ठिकाणं, राजकीय नेते, संस्था, गर्दीची ठिकाणं लक्ष्य करण्याचा अतिरेक्यांचा डाव होता.

News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2018 05:16 PM IST

देशभर बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला

नवी दिल्ली 26 डिसेंबर : देशभर साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणं आणि आत्मघाती हल्ल्याच्या मदतीने राजकीय नेत्यांच्या हत्या करण्याच्या मनसुब्यांना NIA ने उधळून लावलं आहे. NIA ने उत्तर प्रदेश आणि दिल्लीत 17 ठिकाणी छापे टाकून 10 अतिरेक्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि देशी रॉकेट लॉन्चर्स जप्त करण्यात आले आहेत.


ISI या दहशतवादी संघटनेसारखं मोड्युल या अतिरेक्यांनी विकसित केलं होतं. त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये रोख, 100 मोबाईल्स 150 सीमकार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती NIA चे आयजी अलोक मित्तल यांनी दिली आहे.


देशभरातली महत्त्वाची ठिकाणं, राजकीय नेते, संस्था, गर्दीची ठिकाणं लक्ष्य करण्याचा अतिरेक्यांचा डाव होता. अतिरेक्यांच्या हालचालीची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत अतिरेक्यांचा कट उधळून लावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2018 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close