BREAKING: भारतात अल-कायदाच्या सर्वात मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश; 9 दहशतवाद्यांना अटक

BREAKING: भारतात अल-कायदाच्या सर्वात मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश; 9 दहशतवाद्यांना अटक

अल-कायदाचं हे मॉड्यूल पश्चिम बंगाल, एर्नाकुलम, केरळ येथे होते. एनआयएने टाकलेल्या छाप्यात 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर:राष्ट्रीय तपास यंत्रणेला (National Investigation Agency) मोठ यश मिळालं आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अल-कायदाच्या मॉड्यूलला धक्का देण्यात NIA ला यश आलं आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाच जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली आहे. यानंतर अल-कायदाच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांविरोधात आणखीन एक मोठी कारवाई करण्यात पोलिसांना यश आलं आहे. शनिवारी पहाटे केरळमधील एर्नाकुलम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथे अनेक ठिकाणी छापेमारी कऱण्यात आली. या छापेमारीदरम्यान पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या अल-कायदासाठी काम करणाऱ्या 9 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

मुर्शिदाबाद, एर्नाकुलम येथे एनआयएने टाकलेल्या छाप्यात 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदाची भारतातील पाळेमुळे खणून काढली आहे. अलकायदा मॉड्यूलला तोडण्यात आलं असून अलकायदाच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेलं मोठं यश आले.

देशात सध्या चीन व पाकिस्तानसोबत सीमेवर तणाव सुरू आहे. अलकायद्यांच्या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर देशातील इतर भागात यासंदर्भात काही प्रयत्न सुरू असल्यास त्यावर त्वरीत कारवाई करता येऊ शकणार आहे.

हे ही वाचा-शोपियन चकमकीत मारले गेलेले 'ते' तिघे दहशतवादी नव्हते; लष्कराचा मोठा खुलासा

आज सकाळी केरळमधील एर्नाकुलम, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथून एनआयएने 9 अल-कायदाच्या दहशतवादांना अटक केली आहे. पश्चिम बंगाल व केरळसह देशातील विविध राज्यात अल-कायदाचं मॉड्यूल काम करीत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. अलकायदाचा देशात विविध भागात दहशतवादी हल्ला करण्याचा प्लान होता. एनआयएने छापेमारी करीत पश्चिम बंगालमधून 6 आणि केरळमधून 3 जणांना अटक केली आहे. यावेळी त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात डिजिटल वस्तू, डॉक्युमेंट्स, जिहादी साहित्य, शस्त्रे, बंदूका, विविध लेख, घरातच स्फोटके तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आदी गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात हे दहशतवादी देशात विविध ठिकाणी हल्ले करण्याच्या तयारीत होते. यातील काहीजण नवी दिल्लीत जाण्याच्या तयारीत होते.

अटक केलेल्या दहशताद्यांची माहिती

मुर्शिद हसन- केरळ

याकूब बिश्वास-केरळ

मोसर्फ हसन- केरळ

नजमुस साकीब- पश्चिम बंगाल

अबू सुफियान- पश्चिम बंगाल

मैनुल मोंडल- पश्चिम बंगाल

लियू एन अहमद- पश्चिम बंगाल

अल ममून कमल- पश्चिम बंगाल

अतीर रेहमान- पश्चिम बंगाल

प्रथम या दहशतवाद्यांना पश्चिम बंगाल व केरळमध्ये कोर्टासमोर हजर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Published by: Manoj Khandekar
First published: September 19, 2020, 9:02 AM IST

ताज्या बातम्या