नवी दिल्ली, 29 एप्रिल: 2016 मधील आयएसआयएस कासरगोड मॉडयूल प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज रियास अबुबाकर याला पालकड येथून अटक केली. NIAने केलेल्या चौकशी रियास याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. रियासला श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे केरळमध्ये आत्मघाती हल्ले करायचे होते. तसेच तो ISIS या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात होता.
गुप्तविभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर NIAने केरळमधील 3 ठिकाणी छापे टाकले होते. यातील दोन छापे कासरगोड आणि एक छापा पालकाड जिल्ह्यात टाकण्यात आला होता. NIAच्या चौकशीत रियासने काही दिवासांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड जाहरान हाशिम यांचे व्हिडिओ रियास पाहत होता. रियास हा हाशिम पासून प्रभावित झाला होता आणि त्याला केरळमध्ये आत्मघाती हल्ले करायचे होते. तो दहशतवादी अब्दुल रशीद अब्दुल्ला याच्याशी ऑनलाईन नेहमी संपर्कात होता. भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देण्याचे काम करत होता, अशी कबूली रियासने NIAकडे दिली आहे.
NIAकडे श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काही माहिती असल्याचे सांगण्यात आले होते. ही माहिती श्रीलंकन सरकारला देण्यात आली होती. रियास हा झाकिर नाईकचे भाषण ऐकत असल्याचे देखील चौकशीतून समोर आले आहे. रियासला उद्या कोच्ची कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
केरळमधील 15 युवक ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी केल्याचे वृत्त होते. यातील 14 युवक अफगाणिस्तानमध्ये तर एक जण सिरियात गेल्याची सूत्रांची माहिती होती. या प्रकरणी NIAने जुलै 2016मध्ये गुन्हा दाखल केला होता. हे सर्व युवक केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील होते. ISISच्या या कासरगोड मॉडयूल प्रकरणी NIAकडून चौकशी सुरु होती.
श्रीलंका स्फोटातील आत्मघाती हल्लेखोराचा LIVE VIDEO व्हायरल