गाडी पार्क करताना काळजी घ्या, इथं उभा केलीत तर थेट लिलाव

गाडी पार्क करताना काळजी घ्या, इथं उभा केलीत तर थेट लिलाव

गाड्यांचे पार्किंग करताना आपण कोणत्या ठिकाणी करतोय हे पाहा. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला यापुढे कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : अनेकांना रस्त्यावरच वाहन थांबवण्याची सवय असते. काही कामानिमित्त रस्त्याच्या शेजारी वाहन पार्क करून चालक निघून जातो. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. आता राष्ट्रीय महामार्गावर पार्किंग करणाऱ्या लोकांना दंड होईलच पण तो भरला नाही तर थेट गाडीच लिलावात काढली जाणार आहे. बेकायदा पार्किंग कऱणाऱ्या लोकांविरुद्ध नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने कठोर पावलं उचलली आहेत.

आता NHAI अशा गाड्यांवर दंडात्मक कारवाई करू शकणार आहे. रस्ते परिवहन मंत्रालयानं हे अधिकार NHAI ला दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड करण्याचा आणि त्यांची गाडी जप्त करण्याचा अधिकार असेल. इतकंच नाही तर गाडी जप्त केल्यानंतर आठवड्याच्या आत दंड भरला नाही तर गाडीचा लिलाव करण्यात येईल.

सध्या NHAI महामार्गावर कोणत्याही प्रकारचा दंड वसूल करू शकत नाही. आतापर्यंत त्यांना फक्त बेकायदेशिर पार्किंग केलेली वाहनं उचलण्याचा अधिकार होता. यापुढे मात्र, संबंधित वाहन धारकांवर कारवाई करण्याचाही अधिकार NHAI ला असेल.

वाचा : हेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक? ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती

याबाबत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर अशोक शर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पोलीस आणि इतर विभागांना केंद्राने केलेल्या बदलांविषयी माहिती दिली आहे. आता त्यांना या प्रकाराची माहिती आहे. कागपत्रांची पूर्तता झाल्यानंतर NHAI अशा प्रकरणांमध्ये थेट कारवाई करू शकेल.

Loading...

वाचा : दंड कसा करायचा? हेल्मेट नाही म्हणून अडवलं पण पोलिसांनाच पडला प्रश्न

साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: traffic
First Published: Sep 30, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...