पावर प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटानं हादरलं तमिळनाडू, 6 जणांचा जागीच मृत्यू

पावर प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटानं हादरलं तमिळनाडू, 6 जणांचा जागीच मृत्यू

विशाखापट्टणममधील गॅस गळतीची घटना ताजी असतानाच आता आणखी एक मोठी दुर्घटना

  • Share this:

चेन्नई, 01 जुलै: विशाखापट्टणममधील गॅस गळतीची घटना ताजी असतानाच आता आणखी एक मोठी दुर्घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. कुडलोर जिल्ह्यात नेयवेली पावर प्लांट (Neyveli Lignite power plant) प्रकल्पात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 13 हून अधिक लोक जखमी झाली आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

पावर प्लांट कंपनीत हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. कुडलोरमधील नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनच्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. या स्फोट इतका भीषण होता की आकाशात दूरपर्यंत धुराचे लोट दिसत आहेत.

पावर प्लांटमधील बॉइलरमध्ये कशामुळे स्फोट झाला याची तपासणी चालू आहे. दरम्यान या पावर प्लांटमध्ये अनेक नागरिक काम करत होते त्याचवेळी ही भीषण दुर्घटना घडली. या स्फोटात 13 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दर मोठ्या प्रमाणात नुकसानंही झालं आहे. सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 1, 2020, 12:45 PM IST

ताज्या बातम्या