नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर: योगगुरू आणि पतंजली आयुर्वेदाचे सर्वेसर्वा रामदेव बाबा (Yog guru Ramdev baba) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. पुढील 10 ते 20 वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही, असं विधान करत रामदेव बाबा यांनी मोदींबाबत भाकित वर्तवलं आहे.
एवढंच नाही तर रामदेव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि दिग्विजय सिंह (Digvijay Sigh) यांना खोचक सल्ला ही दिला आहे. मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे, असंही रामदेव बाबा यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा..बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपला देण्याची तयारी होती- नितीश कुमार
'News18 India'ला दिलेल्या मुलाखतीत देशात मोदी फॅक्टर आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना रामदेव बाबांनी सांगितलं की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील 10 ते 20 वर्षे काहीही पर्याय नाही. त्याचबरोबर रामदेव यांनी राहुल गांधी यांना 'त्रियोग' करावा तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी 'मौन योग' करावा असा खोचक सल्लाही दिला आहे.
बाबा के 'राम बाण'- कांग्रेस करे शीर्षासन, दिग्विजय सिंह करें समाधि और मौन योग, राहुल गाँधी करें त्रियोग, देखिये ड्रग्स और प्रदूषण से बचने के लिए करें कौन सा योग? #BabaRamdev @AMISHDEVGAN pic.twitter.com/Uc27QO0jkP
— News18 India (@News18India) November 13, 2020
आणखी काय म्हणाले रामदेव बाबा?
रामदेव बाबा यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी आणि देशातील इतर राजकारणींमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. त्यामुळेच देशातील कोट्यवधी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे, हे सगळ्या देशाला हे ठाऊक आहे. जे काही करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे, असा मोदीचा मानस आहे. परमेश्वराच्या कृपाशीर्वादानं त्यांना हे सगळं काही मिळालं आहे, असंही रामदेव बाबा म्हणाले. एवढंच नाही तर देशाच्या राजकारणात सध्या पुढील 10 ते 20 वर्षे मोदींना कोणताही पर्याय नाही, असं मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा...आमदार रवी राणांची अखेर सुटका, तुरुंगातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांना डिवचलं
तुम्ही मोदी भक्त... यावर रामदेव बाबांच उत्तर...
तुम्ही मोदी भक्त आहात? असा तुमच्यावर आरोप होतो, या प्रश्नाला उत्तर देताना रामदेव बाबा यांनी सांगितलं की, 'मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त आहे. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे'