दहावर्षांपूर्वी कारवाई झाली असती तर पुलवामा घडलं नसतं - अमित शहा

नरेंद्र मोदी यांच्या काळातच अतिरेक्यांविरुद्ध सर्वात जास्त कठोर कारवाई झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 09:27 PM IST

दहावर्षांपूर्वी कारवाई झाली असती तर पुलवामा घडलं नसतं - अमित शहा

नवी दिल्ली 31 मार्च : तत्कालीन केंद्र सरकारने 10 वर्षांपूर्वीच जर दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई केली असती तर पुलवामा सारख्या घटना घडल्या नसत्या असं मत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलं. 'न्यूज18'च्या अजेंडा इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शहीदांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. विरोधीपक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

नरेंद्र मोदी यांच्या काळातच अतिरेक्यांविरुद्ध सर्वात जास्त कठोर कारवाई झाली असं मतही त्यांनी व्यक्त केलं. सरकार योग्य वेळी योग्य कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिला.

हल्ल्यावरून राजकारण सुरूच

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. पुलवामा येथे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती आधीपासूनच होती. मंत्रिमंडळाकडे तसा मेसेज देखील होता. पण, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सरकारनं या मॅसेजकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

दरम्यान, सैन्याची वाहने जात असताना ज्या गाडीवर हल्ला झाला त्या गाडीवर बॉम्ब हल्ल्याचा प्रभाव कमी करण्याची सिस्टीम नाही हे त्या दहशतवाद्याला कसे माहित? असा सवाल देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भावी पंतप्रधान नितीन गडकरी यांनी ही बाब स्पष्ट करावी अशी मागणी देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी काही सवाल केले आहेत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2019 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...