राष्ट्रवादावर निवडणूक का लढू नये? -अमित शहा

राष्ट्रवादावर निवडणूक का लढू नये? -अमित शहा

शिवसेना हा भाजपचा मित्र असून तो कायम आमच्यासोबत होता. शिवसेना आणि भाजप हे वैचारिक मित्र आहेत असंही ते म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली 31 मार्च : राष्ट्रवादावर निवडणूक लढण्यास काय हरकत आहे. राष्ट्रवादावर निवडणूक लढविली का जाऊ नये असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलाय. या प्रश्नावर विरोधक करत असलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'न्यूज18'च्या अजेंडा इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शहीदांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना आणि भाजप हे वैचारिक मित्र आहेत असंही ते म्हणाले.

या कार्यक्रमातून जो निधी जमा होईल तो निधी शहीद सैनिक कल्याण फंडात जमा करण्यात येईल अशी घोषणाही 'न्यूज18'ने केली आहे.

शिवसेना दीर्घकाळचा मित्र

शिवसेना हा भाजपचा मित्र असून तो कायम आमच्यासोबत होता असं मत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलं. 'न्यूज18'च्या अजेंडा इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना आणि भाजप हे वैचारिक मित्र आहेत असंही ते म्हणाले. आमचे मतभेद मिटले असून एकदिलाने आम्ही निवडणूक लढविणार आहोत असंही ते म्हणाले.

नेहरुंवर टीका

पाकिस्तानात असलेला दहशतवादी मसूद अझहर याच्यावर जागतिक बंदी घालण्याच्या प्रयत्नांना चीन खिळ घालत आहे. चीनला व्हेटोचा अधिकार असल्यामुळेच चीन असा प्रयत्न करतो आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनीच भारताला मिळणारा व्हेटो अधिकार चीनला दिला असा आरोपही त्यांनी केला.

तर पुलवामा  घडलं नसतं

तत्कालीन केंद्र सरकारने 10 वर्षांपूर्वीच जर दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई केली असती तर पुलवामा सारख्या घटना घडल्या नसत्या असं मत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलं. 'न्यूज18'च्या अजेंडा इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शहीदांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. विरोधीपक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

First published: March 31, 2019, 10:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading