देश धर्मनिरपेक्ष नाही, तर पंथनिरपेक्ष पाहिजे - योगी आदित्यनाथ

देश धर्मनिरपेक्ष नाही तर पंथनिरपेक्ष पाहिजे असं मत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं. News18 च्या रायझिंग इंडिया कार्यक्रमात ते बोलत होते.

Sonali Deshpande | Updated On: Mar 17, 2018 09:38 PM IST

देश धर्मनिरपेक्ष नाही, तर पंथनिरपेक्ष पाहिजे - योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली, १७ मार्च : देश धर्मनिरपेक्ष नाही तर पंथनिरपेक्ष पाहिजे असं मत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं. News18 च्या रायझिंग इंडिया कार्यक्रमात ते बोलत होते. देशात धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावण्यात येत असून धर्मनिरेक्षता म्हणजे सर्वधर्मसमभाव आहे असंही ते म्हणाले.

आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यामुळं नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भारतीय परंपरा, संस्कृती आणि महापुरूषांना शिव्या घालणं म्हणजे धर्मनिरपेक्षता अशी आज व्याख्या झाल्याची टीकाही त्यांनी केली.

उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. आम्हाला

फाजिल आत्मविश्वास नडल्यामुळं पराभव झाल्याची कबूलीही त्यांनी दिली. विजय निश्चित असल्याचं समजून कार्यकर्त्यांनी प्रचार केला नाही. त्यामुळं मतदार बाहेर पडला नाही असं सांगत त्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशातल्या ८० पैकी ८० जागा जिंकू असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2018 09:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close