LIVE NOW

LIVE NarendraModiAtNews18RisingIndia : 'आधार'मुळे विरोधकांची पोटदुखी का वाढली?'

न्यूज18 नेटवर्कच्या वतीने Rising India summit 2019 आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत आपले विचार मांडले.

Lokmat.news18.com | February 25, 2019, 9:11 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 25, 2019
auto-refresh

Highlights

8:55 pm (IST)

Load More
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : प्रत्येक नव्या आघाताबरोबर भारत कमकुवत न होता उलट अधिकाधिक प्रबळ होत आहे आणि पुलवामा हल्ल्यानंतर विरोध विसरून एकत्र येत निषेध करणाऱ्या भारतीयांनी दाखवून दिलं आहे आणि आता त्यालाच सुसंगत वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे तज्ज्ञ, नेते, कलाकार यांना एका मंचावर आणून देशाच्या विकासावर चर्चा घडवून आणायचं काम न्यूज18 नेटवर्क करत आहे. पुढच्या आठवड्यात होणारी ही शिखर परिषद त्यासाठीच आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रायझिंग इंडिया समिट 2019ची सुरुवात करणार आहेत. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी लोकसभा निवडणुकांचा काळ लक्षात घेऊन या परिषदेचा विषय ‘Beyond Politics: Defining National Priorities’ असा ठरवण्यात आला आहे. राजकारण, कला, उद्योग, अध्यात्म आणि सांस्कृतिक क्षेत्रातले मान्यवर या परिषदेला हजेरी लावणार आहेत. उद्घाटनाच्या सत्रात सद्गुरू जग्गी वासुदेव आणि बाबा रामदेव यांच्याशी कवी, गीतकार प्रसून जोशी यांनी संवाद साधला. दुसऱ्या सत्रात Let Set Grow या विषयावर चर्चा झाली. 15 दिवसांमध्ये उद्योगांबाबत सरकार नवं धोरण जाहीर करणार आहे, असे संकेत नीती आयोगाचे CEO  अमिताभ कांत यांनी दिले. तिसऱ्या सत्रात रविशंकर प्रसाद, सुरेश प्रभू, पियूष गोयल सहभागी झाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी चौथ्या सत्रात आपले विचार मांडले.
corona virus btn
corona virus btn
Loading