Home /News /national /

ऑनलाइन शिक्षण सुरू असताना शाळांनी पूर्ण फी घ्यावी का? तुमचं मत सांगा

ऑनलाइन शिक्षण सुरू असताना शाळांनी पूर्ण फी घ्यावी का? तुमचं मत सांगा

ऑनलाईन शाळा किती तास असावी याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहेत. पण शाळांनी या काळात पूर्ण फी घ्यावी का याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. शैक्षणिक शुल्काविषयी तुमचं नोंद या सर्व्हेत नोंदवा

    मुंबई, 24 जुलै : Coronavirus च्या प्रभावामुळे या वर्षी अद्याप शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. पण ऑनलाईन वर्ग मात्र सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाने 15 जूननंतर ऑनलाईन शाळा घ्यायला परवानगी दिली.  ही शाळा किती तास असावी, कशी घ्यावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वसुद्धा जाहीर करण्यात आली आहेत. पण शाळांनी या काळात पूर्ण फी घ्यावी का याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. ऑनलाईन शाळा आणि शालेय शुल्क याविषयी तुमचं मत आमच्याकडे नोंदवा. ऑनलाईन शाळा आणि शुल्करचना याविषयी सर्वसामान्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी News18 एक सर्वेक्षण करत आहे. हा सर्व्हे ऑनलाईन असून सगळ्यांना यात सगभागी होता येईल. ऑनलाइन शिक्षण सुरू असताना शाळांनी पूर्ण फी घ्यावी का? शैक्षणिक फी कमी करण्यासाठी शालेय संस्था तयार झाल्या तर त्याचं प्रमाण किती असावं? तुमच्या मते शाळा पुन्हा केव्हा सुरू करायला हव्या? काही काळाने शाळा सुरू झाल्या तर तुम्ही तुमच्या पाल्यांना शाळेत पाठवायला तयार आहात का? अशा प्रश्नांवरची तुमची मतं, तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी खाली दिलेली प्रश्नावली भरा. देशभरात विविध भाषिक वाचकांमध्ये हा सर्व्हे घेतला जात आहे. सोमवारी या सर्वेक्षणाची निरीक्षणं जाहीर करण्यात येतील. महाराष्ट्रात एवढ्यात शाळा सुरू करण्यास शासनाने असमर्थता अगोदरच व्यक्त केली आहे. पण शिक्षण शुल्काविषयी निर्णय झालेला नाही. गेल्याच आठवड्यात शिक्षण विभागाने कुठल्या इयत्तेसाठी किती तास ऑनलाईन वर्ग घ्यावेत याची नियमावली जाहीर केली. त्यानुसार पहिली- दुसरी एकेक तास, तिसरी ते आठवी दीड तास आणि नववी-दहावी तीन तास ऑनलाईन वर्ग घेता येईल. 45 मिनिटांच्या 4 तासिका नववी- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन घ्याव्यात, असं शासनाने म्हटलं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या