मराठी बातम्या /बातम्या /देश /

आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

पुलवामा इथं झालेल्या या हल्ल्याच्या निमित्तानं केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षेसंदर्भात विशेष बैठक बोलवण्यात आली आहे.

पुलवामा इथं झालेल्या या हल्ल्याच्या निमित्तानं केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षेसंदर्भात विशेष बैठक बोलवण्यात आली आहे.

पुलवामा इथं झालेल्या या हल्ल्याच्या निमित्तानं केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षेसंदर्भात विशेष बैठक बोलवण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाची विशेष बैठक

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले आहे. पुलवामा इथं झालेल्या या हल्ल्याच्या निमित्तानं केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षेसंदर्भात विशेष बैठक बोलवण्यात आली आहे.

एनआयएची टीम पुलवामामध्ये

पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी एनआयएची टीम पोहोचणार आहे. एनआयएची टीम घटनास्थळाचं निरिक्षण करून आपला अहवाल देणार आहे.

बारामतीत शरद पवारांचा कार्यक्रम

आज बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सहाय्य मंत्रालय, जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा परिषद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदारसंघातील 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेंतर्गत कृत्रिम तसेच सहाय्यभूत उपकरणांचे थेट वितरण करण्याचा हा कार्यक्रम आहे. बारामती लोकसभा मतदार संघातल्या 11 हजार 737 ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयवांचं वाटप या कार्यक्रमात होणार आहे.

काँग्रेसची समितीची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जाहिरनाम्याबाबत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

राष्ट्रवादीची बैठक

मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या जागावाटपाबाबत अजूनही तिढा सुटलेला नाही. त्यानिमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला अजित पवार ,छगन भुजबळ आणि इतर नेते उपस्थित राहणार आहे.

First published:

Tags: CRPF, Jammu and kashmir, Kashmir, Kashmir Terror Attack, Pulwama, Terror attack