S M L

न्यूज 18 च्या महिला पत्रकारावर आसाम पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज

याआधीही सप्टेंबर 2017 मध्ये त्रिपुरामध्ये दोन पत्रकारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2018 07:27 PM IST

न्यूज 18 च्या महिला पत्रकारावर आसाम पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज

10 मार्च : आसाम आणि मिजोरम सीमेच्या वादावर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या नेटवर्क 18 च्या महिला पत्रकारावर आसाम पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची संतापजनक घटना घडलीये. या घटनेत महिला पत्रकार एम्बेसी लाॅबेई यांच्या खांदा आणि पाठीवर गंभीर दुखापत झालीये.

गेल्या काही दिवसांपासून आसाम -मिजोराम सीमेवर वाद सुरू आहे. आसाम प्रशासनाने 7 मार्चला मिजोरम येथील सटे हेलाकांडी जिल्ह्यात कलम 144 लागू केलाय. आसाम सरकारला संशय आहे की त्यांच्या क्षेत्रात मिजोरम कडून अतिक्रमण केलं जात आहे. हैलाकांडीचे उपायुक्त आदिल खान आणि अन्य अधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर मिजोरमच्या कोलासिब जिल्ह्याजवळ असलेल्या रामनाथपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कचुर्थलसह जवळील परिसरात कलम 144 लागू करण्यात आलाय.

याच दरम्यान, घटनेचं वार्तांकन करण्यासाठी गेल्या नेटवर्क 18 च्या महिला पत्रकार एम्बेसी लाॅबेई यांच्यावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केलाय. एम्बेसी लाॅबेई यांच्या खांदा आणि पाठीवर गंभीर दुखापत झालीये. एवढंच नाहीतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन स्थानिक नागरिक जखमी झाले आहे.

याआधीही सप्टेंबर 2017 मध्ये त्रिपुरामध्ये दोन पत्रकारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा पत्रकारावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2018 07:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close