Lok Sabha Election 2019: कुणाचं येणार सरकार? News 18-IPSOS Exit Poll आज देणार सर्वात अचूक अंदाज

Lok Sabha Election 2019: कुणाचं येणार सरकार? News 18-IPSOS Exit Poll आज देणार सर्वात अचूक अंदाज

लोकसभेच्या निकालांच्या आधी 'न्यूज18' आणि IPSOS यांनी मिळून देशातला सर्वात विश्वसनिय Exit Poll केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 19 मे : लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काय निकाल लागतील याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या  टप्प्याचं मतदान 19 तारखेला संपेल. त्यानंतर लोकसभेच्या सर्व 542 जागांचं भविष्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. मतमोजणी 23 मे रोजी होणार असून देशाचा नवा पंतप्रधान कोण असेल हे त्याच दिवशी ठरणार आहे. 23 मे रोजी अधिकृत निकाल लागणार असले तरी 'न्यूज18 लोकमत' आजच तुम्हाला नवं सरकार कुणाचं येणार हे सांगणार आहे. मतदानानंतर घेतलेल्या Exit Poll मध्ये लोकांनी कुठला कौल दिला हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लोकसभेच्या निकालांच्या आधी 'न्यूज18' आणि  IPSOS यांनी मिळून देशातला सर्वात विश्वसनिय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे. यात लोकसभेच्या 543 जागांपैकी 199 जागांची निवड करण्यात आलीय. देशातल्या 28 राज्यांमधल्या 199 मतदारसंघातल्या 796 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांचा कौल घेण्यात आलाय. यात 4776 मतदान केंद्रातून 25 मतदारांची निवड करण्यात आली.

या प्रक्रियेत विविध मतदारसंघातल्या मतदान केंद्रांवरच्या मतदारांना विविध प्रश्न विचारण्यात आलेत. 199 लोकसभा मतदारसंघात किमान दिड लाख लोकांची मतं जाणून घेण्यात आलीत. या मतदार संघांची निवड करतानाही खास काळजी घेण्यात आली आहे. ज्या मतदार संघात जो उमेदवार सलग दोन किंवा तीन वेळा निवडून आला असेल किंवा जिथे विजयातलं  अंतर कमी असेल, ज्या ठिकाणी प्रत्येक वेळी वेगळे निकाल लागतात, ज्या ठिकाणी दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत असा विविध मतदारसंघांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

त्याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदार संघातल्या चार किंवा सहा विधानसभा मतदार संघातल्या सहा मतदान केंद्रातून विविध मतदारांची निवड करण्यात आली. मतदान केंद्रातून बाहेर पडलेल्या प्रत्येक तिसऱ्या मतदाराला हे प्रश्न विचारण्यात आले. यात विविध वयोगट, भाषा, संस्कृती आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार करण्यात आला आहे. अचूक Exit Poll येण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सर्व घटकांची काळजी घेण्यात आली आहे.

तर निकाल लागण्याआधीच विरोधी पक्षांची जुळवाजुळव सुरू झालीय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत. लोकसभेच्या निवडणुकांचा निकाला लागण्याआधीच विरोधकांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. आम्ही परिस्थितीचं विश्लेषण करत असून 23 तारखेनंतरच पुढचा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केलीय. पवारांच्या या प्रतिक्रियेमुळे अनेक पक्षांची चिंता वाढली आहे.

First published: May 19, 2019, 3:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading