News 18.com ठरली देशातली सर्वांत मोठी न्यूज अ‍ॅग्रिगेटर

News 18.com ठरली देशातली सर्वांत मोठी न्यूज अ‍ॅग्रिगेटर

News.18.com ने देशभरातल्या अ‍ॅग्रिगेटर्समध्ये आघाडी घेतली आहे. राजकारण, बिझनेस, खेळ, मनोरंजन, तंत्रज्ञान, ऑटोमोबाइल या क्षेत्रातलं वार्तांकन आणि तज्ज्ञांचं विश्लेषण देणारी ही अ‍ॅग्रिगेटर वेबसाइट पहिल्या क्रमांकावर आहे.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : News.18.com ने देशभरातल्या अ‍ॅग्रिगेटर्समध्ये आघाडी घेतली आहे. राजकारण, बिझनेस, खेळ, मनोरंजन, तंत्रज्ञान, ऑटोमोबाइल या क्षेत्रातलं वार्तांकन आणि तज्ज्ञांचं विश्लेषण देणारी ही अ‍ॅग्रिगेटर वेबसाइट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल Dailyhunt आणि NDTV.com या अ‍ॅग्रिगेटर्सचा क्रमांक लागतो. अ‍ॅग्रिगेटर म्हणजे बातम्यांचं एकत्रीकरण करणारी वेबसाइट.

कॉमस्कोअर इंडिया च्या जुलै - ऑगस्ट महिन्याच्या सर्व्हेनुसार News.18.com या वेबसाइटला 10 हजार 374 कोटी लोकांनी भेट दिली. Dailyhunt आणि NDTV.com या दोन्ही वेबसाइटना मागे टाकत News18.com ही वेबसाइट पहिल्या नंबरवर पोहोचली आहे. न्यूज 18 लोकमत हा याच वेबसाइटचा एक भाग आहे.

Dailyhunt या वेबसाइटला 10 हजार109 कोटी लोक भेट देतात. तर NDTV.com या वेबसाइटला 7 हजार 637 कोटी लोक भेट देतात.

(हेही वाचा : विधानसभा निवडणूक : भारताच्या माजी कर्णधाराचा भाजपमध्ये प्रवेश)

News18.com ही वेबसाइट 3 वर्षांपूर्वी सुरू झाली. या 3 वर्षांच्या काळात या वेबसाइटने वेगाने प्रगती केली आहे. ही वेबसाइट आणि अ‍ॅप 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. डिजिटल माध्यमांमध्ये News18.com वेगवेगळ्या भाषांतल्या वाचकांपर्यंत पोहोचली आहे.

डिजिटल माध्यमांमध्ये News18.com ने केलेल्या या घोडदौडीबद्दल आम्हाला अभिमान आहे, असं नेटवर्क 18 च्या डिजिटल विभागाचे प्रेसिडेंट पुनीत सिंघवी यांनी म्हटलं आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे, असंही ते म्हणाले. टेलिव्हिजन, इंटरनेट, फिल्म्स, इ कॉमर्स, मासिकं, मोबाइल या माध्यमांमध्ये आणि संबंधित व्यवसायात News18.com चा पसारा विस्तारलेला आहे.

ब्रेकिंग न्यूज, विश्लेषण, आर्थिक माहिती आणि मनोरंजन असं सगळंच Network 18 Digital या एकाच प्लॅटफॉर्मवर वाचकांना मिळतं. त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात वाचक या वेबसाइटला भेट देतात.

===================================================================================

VIDEO : पुण्याच्या पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Published by: Arti Kulkarni
First published: September 26, 2019, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading