मणिपूर, 18 मे : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, निकालाआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये भाजप सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे निकालाआधीच भाजपच्या ताब्यातून एक राज्य निसटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
मणिपूरमध्ये भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या नागा पिपल्स फ्रंटच्या नेत्यांनी पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आज नागा पिपल्स फ्रंटच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पाठिंबा काढून घेण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. जर नागा फ्रंटने पाठिंबा काढला तर भाजप सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे.
Achumbemo Kikon, Naga People's Front (NPF) Spokesperson to ANI: We had a long meeting at NPF central office in Kohima and decided to withdraw support in principle from the BJP led Manipur government. pic.twitter.com/XOAf5i65mT
— ANI (@ANI) May 18, 2019
२०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मणिपूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मणिपूर विधानसभेमध्ये एकूण 60 जागा आहेत. यापैकी काँग्रेसला 28 जागा मिळाल्या तर भाजपला 21 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 31 आमदारांची आवश्यकता होती.
भाजपला नॅशनल पीपल्स पार्टी ( एनपीपी) आणि एलजेपी यांनी पाठिंबा दिला. हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटक पक्ष आहे. एनपीपीला 4 जागा आणि एलजेपीची 1 जागेच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या 26 जागा झाल्या होत्या. त्यानंतर ५ जागांसाठी भाजपने नागा पिपल्स फ्रंटच्या पाठिंबा मिळवला आणि सरकार स्थापन केलं होतं.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्षभरात भाजपला मणिपूरमध्ये आता सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजप सरकार वाचवण्याची काय प्रयत्न करतंय हे पाहण्याचं ठरणार आहे.
मणिपूर विधानसभेत संख्याबळ - एकूण जागा 60 जागा
काँग्रेस - 28
भाजप - 21
एनपीपी - 4
एलजेपी - 1
नागा पिपल्स फ्रंट - 4
तृणमूल काँग्रेस - 1
अपक्ष -1
========================