LIVE NOW

भोपाळ : माथेफिरू तरुणाने दिली आत्महत्येची धमकी

या युवतीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे.

Lokmat.news18.com | July 13, 2018, 7:16 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 13, 2018
auto-refresh

Highlights

Load More
भोपाळ, 13 जुलै : मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एक भयानक प्रकरण समोर आलं आहे. ते म्हणजे एका माथेफिरूने मुंबईच्या एका मॉडेलला त्याच्या घरात बंदी करून ठेवले आहे. रोहित सिंह असं या युवकाचं नाव आहे. त्याने या मॉडेलला त्याच्या घरात बांधून ठेवलं आहे. ही युवती BSNLच्या निवृत्त एजीएमची मुलगी आहे. आणि ती आत त्या युवकाच्या इमारतीच्या 5 मजल्यावर त्याच्या खोलीत बंद आहे. या युवतीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रोहित हा या युवतीला आधीपासूनच ओळखतो आणि गेल्या अनेक दिवसांपासून तो तिला लग्नासाठी जबरदस्ती करत आहे. पण युवतीचा नकार असल्यामुळे तिच्यावर दबाव टाकत तिला त्याने त्याच्या घरात कैद करून ठेवलं आहे. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पण पोलिसांनी जर घरात येण्याचा प्रयत्न केला तर मी स्वत:ला गोळी जाडून घेईन अशी धमकी रोहितने दिली आहे. दरम्यान त्याने युवतीला मारहाण केली आहे आणि त्याचा व्हिडिओ काढत त्याने तो सोशल मीडियावर व्हायरलही केला आहे. ही युवती अजूनही त्या नराधमाच्या ताब्यातच आहे. पोलिस अधिकारी रोहितशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पोलिसांना पाहताच रोहितने स्वत:लाही रक्तबंबाळ केलं आहे. पोलिसांनी रोहितबद्दल मिळवलेल्या माहितीनुसार, तो अलीगडचा राहणारा आहे. त्याने याआधीही असा प्रकार केला आहे.रोहितसुद्धा मुंबईला मॉडलिंग करतो. त्याच्या या कृत्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण ओळखीच्या जोरावर त्याला सोडण्यात आलं.
corona virus btn
corona virus btn
Loading