मराठी बातम्या /बातम्या /देश /न्यूज अँकर निधी राजदान झाल्या मोठ्या सायबर फ्रॉडची शिकार; थेट हार्वर्डच्या नावानेच झाली फसवणूक

न्यूज अँकर निधी राजदान झाल्या मोठ्या सायबर फ्रॉडची शिकार; थेट हार्वर्डच्या नावानेच झाली फसवणूक

एका मोठ्या चॅनलच्या प्रसिद्ध न्यूज अँकर आणि पत्रकार असलेल्या व्यक्तीला किती पद्धतशीरपणे जाळं विणून (Online Phishing) थेट Harward University च्या नावाने फसवण्यात आलं हे वाचून धक्का बसेल.

एका मोठ्या चॅनलच्या प्रसिद्ध न्यूज अँकर आणि पत्रकार असलेल्या व्यक्तीला किती पद्धतशीरपणे जाळं विणून (Online Phishing) थेट Harward University च्या नावाने फसवण्यात आलं हे वाचून धक्का बसेल.

एका मोठ्या चॅनलच्या प्रसिद्ध न्यूज अँकर आणि पत्रकार असलेल्या व्यक्तीला किती पद्धतशीरपणे जाळं विणून (Online Phishing) थेट Harward University च्या नावाने फसवण्यात आलं हे वाचून धक्का बसेल.

  नवी दिल्ली, 15 जानेवारी: सायबर अटॅक, सायबर क्राइम, ऑनलाइन व्यवहारात फसवणूक अशा बातम्या आपण नेहमी वाचत असतो. पण एका मोठ्या चॅनलच्या प्रसिद्ध न्यूज अँकर आणि पत्रकार असलेल्या व्यक्तीला किती पद्धतशीरपणे जाळं विणून थेट Harward University च्या नावाने फसवण्यात आलं हे वाचून धक्का बसेल. स्वतः निधी राजदान यांनीच याविषयी Tweet करून याविषयी सांगितलं.

   निधी राजदान यांनी गेल्या वर्षी आपल्याला हार्वर्ड युनिव्हर्सिटीकडून असोसिएट प्रोफेसर म्हणून रुजू व्हायची ऑफर आली आहे, असं सोशल मीडियावरूनच जाहीर केलं होतं. त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीकडून तसं पत्र आणि इतर माहिती आली होती. निधी यांनी या प्रथितयश विद्यापीठात अध्यापनाची संधी मिळाल्यावर चॅनेलमधली नोकरीसुद्धा सोडली आणि त्या या नव्या प्रोजेक्टच्या तयारीला लागल्या. 21 वर्ष करत असलेली नोकरी निधी यांनी ज्या हार्वडच्या ऑफरसाठी सोडली, ती ऑफरच फेक असल्याचं निष्पन्न झालं आहे.

  खरं तर सप्टेंबरमध्ये त्यांना आलेल्या इमेलमध्ये त्या कुठला कोर्स आणि कसा घ्यायचा याविषयीसुद्धा त्यांना कळवण्यात आलं होतं. पण सप्टेंबर 2020 मध्ये त्या रुजू होणार होत्या. पण जगभरात सुरू असलेल्या Covid-19 च्या साथीमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली. मग त्यांना (कथित) हार्वडकडून कळवण्यात आलं की, जानेवारीपासून क्लासेस सुरू होतील.  कोरोनामुळे सगळीकडेच विद्यापीठांमध्ये अशी परिस्थिती असल्याने त्यांना हा 'न्यू नॉर्मल' आहे, असं वाटून फारसं लक्ष दिलं नाही.

  जानेवारी सुरू झाला तरी क्लासबाबत फारशी काही हालचाल दिसेना तेव्हा निधी यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रशासनात उच्चाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्या वेळी प्रशासनाकडून त्यांना या नोकरीसंबंधीची कागदपत्र दाखवा, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर खऱ्या प्रकाराचा उलगडा झाला. ही अगदी खऱ्यासारखी दिसणारी कागदपत्रं खोटी (Fake) होती, असं स्पष्ट झालं. निधी राजदान यांना हार्वडकडून कुठलीच ऑफर देण्यात आली नव्हती.

  हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच निधी यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्याकडची सर्व इ मेल कम्युनिकेशनचे पुरावे दिले आहेत. पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.

  First published:

  Tags: Cyber crime