न्यूज अँकरची गोळ्या घालून हत्या, हल्लेखोराने स्वत:लाही घेतलं मारून

न्यूज अँकरची गोळ्या घालून हत्या, हल्लेखोराने स्वत:लाही घेतलं मारून

पाकिस्तानात कराचीमध्ये एका न्यूज अँकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुरीद अब्बास हे न्यूज अँकर बोल या न्यूज चॅनलसाठी काम करत होते. मुरीद अब्बास आणि त्यांच्या मित्राचा एका व्यक्तीशी वाद झाला. याचा राग धरून त्या व्यक्तीने मुरीद अब्बास आणि त्यांच्या मित्राला गोळी मारली आणि स्वत:लाही मारून घेतलं.

  • Share this:

कराची, 10 जुलै : पाकिस्तानात कराचीमध्ये एका न्यूज अँकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुरीद अब्बास हे न्यूज अँकर बोल या न्यूज चॅनलसाठी काम करत होते. मुरीद अब्बास आणि त्यांच्या मित्राचा एका व्यक्तीशी वाद झाला. याचा राग धरून त्या व्यक्तीने मुरीद अब्बास आणि त्यांच्या मित्राला गोळी मारली आणि स्वत:लाही मारून घेतलं.

मित्रालाही लागल्या गोळ्या

मुरीद अब्बास यांचा मित्र खिजर हयात याला दोन गोळ्या लागल्या. यानंतर त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याचा मृत्यू ओढवला.

स्पाइसजेटच्या तंत्रज्ञाचा मृत्यू, या एअरपोर्टवर घडली दुर्घटना

या हल्ल्यात मारले गेलेले मुरीद अब्बास यांची पत्नी जारा अब्बास याही न्यूज अँकर आहेत. हल्लेखोर आतिफ हा मुरीद अब्बास यांचा बिझनेस पार्टनर होता, असं जारा अब्बास यांनी सांगितलं. त्यांच्यामध्ये व्यावसायिक कारणांवरून मतभेद होते. त्यामुळेच मुरीद अब्बास यांचा खून झाला.

हल्लेखोराचाही मृत्यू

याच घटनेत या हल्लेखोरानेही स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू ओढवला.

World Cup Semi Final : अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडिओही होतोय व्हायरल

=====================================================================================

SPECIAL REPORT : भक्तांची अलोट गर्दी जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 07:43 PM IST

ताज्या बातम्या