S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

नोटबंदीचा फुगा फुटला ; 99 टक्केच नोटा परत, फक्त 1 टक्के काळा पैसा ?

बाद केलेल्या नोटांच्या एकूण दीड टक्के नोटाच परत आल्या नाही असं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात पुढे आले आहे.

Sachin Salve | Updated On: Aug 31, 2017 05:19 PM IST

नोटबंदीचा फुगा फुटला ; 99 टक्केच नोटा परत, फक्त 1 टक्के काळा पैसा ?

कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली

31 आॅगस्ट : नोटबंदीनंतर किती पैसे बँकेत जमा झाले यावरुन अखेर रिझर्व्ह बँकेनी पडदा उठवलाय. बाद केलेल्या नोटांच्या एकूण दीड टक्के नोटाच परत आल्या नाही असं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात पुढे आले आहे. या वरुन विरोधकांनी नोटबंदी अपयशी झाल्याचा आरोप करीत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

26 नोव्हेंबर 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 च्या चलनातून नोटा बंद करून या द्वारे काळा पैशावर मोठा वार होणार असल्याच्या दावा केला होता. नोटबंदीमुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. भारतभर तीव्र नोटांची टंचाई निर्माण झाली होती. एटीममधून पैसे निघत नव्हते आणि बँकेत ठरावी पैसेच दिले जात होते. त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले होते. सर्वात जास्त नोटबंदीचा शेतकऱ्यांना फटका बसला होता.  लोकांनी बँकेत नोटा जमा केल्या त्या किती परत आल्या असा सवाल सातत्याने सरकार ला केल्या जायचा अखेर बुधवारी रिझर्व्ह बँकेने या संदर्भात आकडे जाहीर केले.या आकड्यानुसार  सरकार ने 15.44 लाख कोटीच्या मोठ्या नोटा बंद केल्या होत्या. त्यापैकी 15.28 लाख नोटाचं परत आल्यात. अजूनही 16 हजार कोटीच्या नोटा परत बँकिंग सिस्टीममध्ये आल्या नाही. म्हणजेच एकूण बंद झालेल्या नोटांच्या दीड टक्केच नोटा परत बँकेत येऊ शकल्या नाही.

हा आकड़ा पुढे आल्या नंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्वीट करून सरकारवर टीका केली.

जर फक्त दीड टक्के नोटा परत आल्या तर नोटबंदीचा अर्थ काय ? सरकार ने लोकांची माफी मागायला हवी.

काँग्रेसने लगेच पत्रकार परिषद घेऊन सरकारकडे स्पष्टीकरण मागितले.

या रिपोर्टनंतर लगेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्टीकरण दिले की, "नोटबंदीचा उद्देश यशस्वी झाला आहे. यामुळे टेरर फंडिंग थांबली आहे आणि डिजिटल ट्रंझक्शन वाढले आहे."

नोटबंदीमुळे भाजपला उत्तर प्रदेश निवडणुकीत मोठा फायदा झाला होता. पण आता या रिपोर्टमुळे सरकारला घेरण्याचे मोठे शस्त्र विरोधकांच्या हाती आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close