न्यूज 18 आणि IPSOS चा सर्व्हे ठरला अचूक, प्रत्यक्ष मतदारसंघांत जाऊन असा केला सर्व्हे

न्यूज 18 आणि IPSOS चा सर्व्हे ठरला अचूक, प्रत्यक्ष मतदारसंघांत जाऊन असा केला सर्व्हे

यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलची खूप चर्चा झाली. वेगवेगळ्या यंत्रणांनी हे सर्व्हे केले होते पण या सगळ्या सर्व्हेमध्ये न्यूज 18 चा एक्झिट पोल अचूक ठरला. IPSOS या संस्थेने हा सर्व्हे केला होता. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा IPSOS या संस्थेने अचूक सर्व्हे देऊन स्वत:ला सिद्ध केलं आहे.

  • Share this:

पारिजात चक्रवर्ती

नवी दिल्ली, 25 मे : यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलची खूप चर्चा झाली. वेगवेगळ्या यंत्रणांनी हे सर्व्हे केले होते पण या सगळ्या सर्व्हेमध्ये न्यूज 18 चा एक्झिट पोल अचूक ठरला. IPSOS या संस्थेने हा सर्व्हे केला होता. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा IPSOS या संस्थेने अचूक सर्व्हे देऊन स्वत:ला सिद्ध केलं आहे.

वेगवेगळ्या संस्थांनी केलेले सर्व्हे पाहिले तर न्यूज 18 ने दाखवलेला IPSOS चा सर्व्हे किती अचूक होता हे लक्षात येईल.इथे संस्थांची नावं आणि त्यांनी दिलेले अंदाज दिले आहेत. त्यावरून हे सर्व्हे किती तपशीलवार होते हेही लक्षात येतं.कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यासोबतच मतांच्या टक्केवारीचे अंदाजही अचूक ठरले. एनडीएला 48.5 टक्के मतं मिळतील, असं IPSOS ने म्हटलं होतं. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार एनडीए ला 49 टक्के मतं मिळाली.


सर्व्हेचं नियोजन, अमलबजावणी आणि विश्लेषण या तिन्ही पातळ्यांवर IPSOS ने तपशीलवार आराखडा तयार केला होता.

नियोजन

योग्य ठिकाणी जाऊन सर्व्हे करणं ही पहिली पायरी. जागतिक पातळीवर सर्व्हे करण्याचा IPSOS चा अनुभव इथे खूप उपयोगी पडला. शास्त्रीय पद्धतीने सर्व्हेचे सँपल तयार करण्यात आले होते.

पहिल्यांदा देशभरातले 199 मतदारसंघ निवडण्यात आले. या मतदारसंघातले 796 विधानसभा मतदारसंघ सर्व्हेसाठी नक्की करण्यात आले. यामध्ये 4 हजार 776 मतदान केंद्रं होती. या मतदान केंद्रांमध्ये वेगवेगळ्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व होतं.

अमलबजावणी

सर्व्हे घेताना नियोजनाप्रमाणेच घेण्यात आले. इतर संस्थांनी पोस्ट पोल, ऑनलाइन, टेलिफोनिक, मोबाइल अॅप अशा माध्यमांतून मिळालेली शॉर्ट कट माहिती वापरली. पण IPSOS च्या सर्व्हेमध्ये मात्र असे शॉर्टकट नव्हते. इथे प्रत्यक्ष मतदारसंघात जाऊन सर्व्हे केला गेला.

मतदानाच्या सातही टप्प्यांमध्ये मतदानाच्या दिवशी ठरलेल्या मतदानकेंद्रांवर सर्व्हे झाला. मतदारांनी सर्व्हेमध्ये उत्तरं देताना त्यांच्यावर कुणी प्रभाव टाकू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.

टॅबलेटवर EVM

सगळ्या मुलाखती टॅबलेट्समध्ये रेकॉर्ड करण्यात आल्या. या टॅबलेट्सवर इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रासारखं बटन दाबायचं होतं. ज्या मतदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यांना दूर जाऊन टॅबलेटवरच्या इव्हीएमचं बटन दाबायचं होतं. त्यामुळे मतदारांवर ही उत्तरं देताना कोणताही दबाव नव्हता.

या सगळ्या सर्व्हेमध्ये प्रचंड माहिती जमा झाली. प्रत्यक्ष मतदारसंघांत होणाऱ्या सर्व्हेवर चार प्रादेशिक नियंत्रण कक्ष आणि एका राष्ट्रीय नियंत्रण कक्षाचं नियंत्रण होतं.

माहितीचं वर्गीकरण

या माहितीचं वय, लिंग, धर्म, जात यानुसार वर्गीकरण करून मतदारसंघांनुसार एक सँपल बनवण्यात आलं. त्यावरून मतदारांचा कल आजमावण्यात आला. हे अंदाज वर्तवण्यासाठी वेगवेगळ्या गणिती पद्धतींचा अवलंब करून हे आकडे नक्की करण्यात आले.

IPSOS ने याआधीही असेच शास्त्रशुद्ध सर्व्हे केले आहेत. काटेकोर नियोजन,सांख्यिकी, अचूक माहिती, सखोल विश्लेषण यामुळे या संस्थेने केलेले सर्व्हे खरे ठरले आहेत.

(हा लेख IPSOS India चे Country Service Lines Group Leader मयांनी लिहिला आहे. )

=================================================================================================

VIDEO : लोकसभेत महाराष्ट्राची महिला शक्ती, काय म्हणाल्या नवनिर्वाचित खासदार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या