न्यूज18 तर्फे 'अजेंडा इंडिया' कार्यक्रमाचं आयोजन, शहिदांच्या कुटुंबीयांचा होणार सन्मान

न्यूज18 तर्फे 'अजेंडा इंडिया' कार्यक्रमाचं आयोजन, शहिदांच्या कुटुंबीयांचा होणार सन्मान

न्यूज 18 तर्फे 31 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता ‘अजेंडा इंडिया’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मार्च: जीवाची पर्वा न करता देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा 'न्यूज 18'कडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. राजधानी नवी दिल्ली येथे 'न्यूज 18'तर्फे 'अजेंडा इंडिया' या कार्यक्रमाचे 31 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी 4 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमामध्ये राजकीय विश्लेषक लोकसभा निवडणूक 2019चा राजकीय अजेंडा काय आहे? याचसोबत देशाचं राजकारण, विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. राजकीय रणधुमाळी, देशातील बदलते राजकीय वारे आणि तितक्याच वेगानं उमेदवारांनी बदलेले पक्ष, प्रियांका गांधींची बोट यात्रा काँग्रेसला आगामी निवडणुकीत तारू शकेल का? राफेल करार, विकासाच्या मुद्यावरून सुरू असलेलं राजकारण आणि आगामी निवडणुकीसाठी प्रचारात कोणता महत्त्वाचा मुद्दा असेल यावर 'अजेंडा इंडिया' कार्यक्रमात विशेष चर्चा केली जाणार आहे.

याचसोबत ‘अजेंडा इंडिया’ कार्यक्रमात एक सत्र पूर्णतः शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी ठेवण्यात आला आहे. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांना 'जय हिंद सन्मान' प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी, रणदीप सुरजेवाला, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी उपस्थित राहणार आहेत. ‘अजेंडा इंडिया’ या कार्यक्रमासाठी भारतीय सुरक्षा दलातील अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत.


VIDEO: 'सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय इंदिरा गांधी घेऊ शकतात, तर मोदी का नाही?'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या