पोस्ट वेडिंग फोटोशूटमुळे नव दाम्पत्याला जाच, 'नको त्या' प्रश्नांमुळे वधुचा चढला पारा

पोस्ट वेडिंग फोटोशूटमुळे नव दाम्पत्याला जाच, 'नको त्या' प्रश्नांमुळे वधुचा चढला पारा

दाम्पत्याने केलेल्या या फोटोशूटवर खूप टीका केली जात आहे

  • Share this:

केरळ, 17 ऑक्टोबर : केरळमधून समोर आलं सायबर बुलिंगचं दुसरं प्रकरण! गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका जोडप्याने नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधी (CAA) आणि एनआरसीच्या निषेधासाठी फलक लावून निषेध व्यक्त केला. तिरुअनंतपुरममधील जीएल अरुण गोपी आणि आशा शेखर ह्या जोडप्याने आपल्या प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये "No CAA" आणि "No NRC" असे फलक घेऊन पोझ केलं होतं. ह्या जोडप्याला त्यानंतर खूप सायबर बुलिंग आणि निगेटिव्ह कमेंट्सचा सामना करावा लागला होता.

असाच आणखी एक प्रकार आता केरळमधून पुन्हा समोर आला आहे. ऋषी कार्तिकेयन आणि लक्ष्मी ह्या जोडप्याचं लग्न 16 सप्टेंबरला झालं. कोरोना काळात लग्न झाल्यामुळे त्यांना लग्नची मज्जा घेता आली नाही. ह्याच गोष्टीला विचारात घेत त्यांनी लग्नानंतरच्या आयुष्याला आणि उत्साहाला फोटो रुपात टिपण्यासाठी आपल्या एका फोटोग्राफर मित्राला सोबत घेऊन एक पोस्ट-वेडिंग फोटोशूट केलं. इडुक्कीच्या चहाच्या बागांमध्ये झालेल्या ह्या फोटोशूटमध्ये हे दोघेही त्या फोटोमध्ये पांढऱ्या शुभ्र चादरीत बागांमध्ये पळताना दिसत आहेत.

हे ही वाचा-टीम इंडियाच्या फास्ट बॉलरला कोरोनाची लागण, 'आयपीएल'मधून बाहेर

त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर येताच असं झालं की काहींना ते फोटो चुकीचे वाटल आहेत. द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार, अनेक लोकांनी हे फोटो अश्लील आणि अनुचित असल्याचे आरोप केले आणि जोडप्याची निंदा केली. काहींनी असंही म्हटलं की हे फोटो 'नग्नता' दर्शवत आहेत. काहींनी तर प्रतिक्रियांचा कळसच केला "तुम्ही त्या पांढऱ्या कापडाच्या आत आतले कपडे घातले आहेत का?, असे घाणेरडे आणि किळसवाणे प्रश्नही मला इंटरनेटवरच्या लोकांनी विचारले", असं लक्ष्मीने द न्यूज मिनिटला सांगितलं.

हे ही वाचा-साध्यासुध्या 'अंजली भाभी'चा हॉट अंदाज; PHOTOS पाहून व्हाल क्लीन बोल्ड

मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून वारंवार फोन वरून फोटो इंटरनेटवरून काढण्याचा सल्ला मिळत असूनही हे जोडपं आपल्या मतावर ठाम आहे की ते फोटो इंटरनेटवरून काढायचे नाहीत. ऋषीने पुढे हे ही स्पष्ट केलं की ह्या फोटोशूटची कल्पना फोटोग्राफर अखिल कार्तिकेयनची असून त्या दोघांचं ह्या कल्पनेला पाठिंबा होता. अखिल वेडिंग स्टोरीज फोटोग्राफी ही कंपनी चालवतो. या जोडप्याला पारंपरिक वेष्टि आणि साडी नेसलेले फोटो नको होते. एखादं वेगळं फोटोशूट करायचं होतं. लग्नानंतरची जवळीक दाखवणारं आणि त्यातील गोडवा दर्शवणारं असं हे फोटोशूट आहे असं त्यांचं मत आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: October 17, 2020, 10:00 PM IST

ताज्या बातम्या