Home /News /national /

हनिमूनच्या रात्रीच दिल्या नरक यातना; मित्रांसोबत मिळून पतीने नवविवाहितेसोबत केलं धक्कादायक कृत्य

हनिमूनच्या रात्रीच दिल्या नरक यातना; मित्रांसोबत मिळून पतीने नवविवाहितेसोबत केलं धक्कादायक कृत्य

Crime News: हनिमूनच्या रात्रीच एका तरुणानं मित्रांच्या मदतीने आपल्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. आरोपींनी गुंगीचं औषध पाजून पीडितेला नरक यातना दिल्या आहेत.

    इटावा, 04 डिसेंबर: हनिमूनच्या रात्रीच एका नवविवाहितेवर पतीसह त्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याची ( newly wed woman raped by husband and his friend) संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीने पीडित विवाहितेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर मित्रांमार्फत बलात्कार केला आहे. पण तिची प्रकृती बिघडल्यानंतर आरोपींनी पीडितेला रुग्णालयात दाखल करून पळ काढला आहे. आरोपींनी पीडितेला मारहाण देखील केली आहे. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या आहेत. तसेच तिच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील इटावा येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 नोव्हेंबर रोजी चौबियाजवळील एका गावातील पीडित मुलीचं लग्न झालं. लग्नानंतर 29 नोव्हेंबर रोजी तिला सासरी नांदायला पाठवण्यात आलं होतं. सासरी गेल्यानंतर सासरच्या मंडळीनं मोठ्या उत्सहात तिचं स्वागत केलं होतं. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर सायंकाळी अचानक तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिच्या पतीनं तिला कोणतं तरी औषध दिलं. हेही वाचा-फेसबुकवरील मित्रानं केला घात, आधी रेप केला मग पीडितेच्या वडिलांकडे मागितले 10लाख हे औषध प्यायल्याने तिला गुंगी आली. बेशुद्धावस्थेत असताना हनिमूनच्याच दिवशी आरोपी पतीसह त्याच्या मित्रांनी नवविवाहितेवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यामुळे पीडितेची प्रकृती आणखीच खालावली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी पीडितेला रुग्णालयात दाखल करत रुग्णालयातून पळ काढला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर, पीडित मुलीच्या वडिलांनी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची सत्यता पडताळल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. हेही वाचा-Beed: पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; कंटाळलेल्या पतीनं उचललं भयावह पाऊल नवविवाहित पीडित महिलेच्या अंतर्गत भागात दुखापत झाल्याची पुष्टी तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केली आहे. तसेच तिच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या खूणा आढळल्याची माहिती देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासोबतच पीडितेच्या गर्भाशयाला देखील दुखापत झाल्याचा संशय डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पीडितेचा अल्ट्रा साउंड चेकअप करण्यात येणार असल्याची माहिती महिला डॉक्टरांनी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Rape, Uttar pradesh

    पुढील बातम्या