• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ती म्हणाली ‘शिकायचंय’, पती म्हणाला ‘नको’, ग्रामपंचायत म्हणाली ‘वेगळे व्हा’ !

ती म्हणाली ‘शिकायचंय’, पती म्हणाला ‘नको’, ग्रामपंचायत म्हणाली ‘वेगळे व्हा’ !

लग्नानंतर (Marriage) सासरची मंडळी शिक्षणात (Education) अडथळे आणू पाहत असल्यामुळे एका नवविवाहितेवर (Newly married woman) आपलं लग्न मोडण्याची (Separation) वेळ आली.

 • Share this:
  पटना, 2 ऑगस्ट : लग्नानंतर (Marriage) सासरची मंडळी शिक्षणात (Education) अडथळे आणू पाहत असल्यामुळे एका नवविवाहितेवर (Newly married woman) आपलं लग्न मोडण्याची (Separation) वेळ आली. लग्नानंतर शिकण्याची इच्छा असूनही सतत सासरच्या मंडळींचा विरोध होत असल्याचं पाहून तिनं घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ही बाब तिच्या माहेरी समजताच वडिलांनी पोलीस तक्रार दाखल केल्यामुळे तिनं परत येत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात असणाऱ्या सुल्तानगंज प्रखंड गावातील ही घटना. नेहा कुमारी या तरुणीचं सुनील पंडित या तरुणाशी लग्न झालं. मात्र लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून तिच्या शिक्षणासाठी विरोध होऊ लागला. तिनं शिक्षणाचा नाद सोडून घरकाम करावं, असा दबाव तिच्यावर येऊ लागला. त्यावर तिनं एक दिवस संधी पाहून घरातून पळ काढला आणि शिक्षणासाठी ती पाटनामध्ये गेली. तिच्या सासरच्यांनी आपली सून गायब झाल्याचं तिच्या वडिलांना कळवलं. पोलीस तक्रार दाखल आपली मुलगी गायब झाल्याची तक्रार नेहाच्या वडिलांनी पोलिसांत दिली. पोलिसांनी नेहाचा शोध सुरु केला. आपला शोध सुरु असल्याचं कळताच नेहा परत माहेरी आली आणि आपल्या वडिलांना तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितला. वडील तिला पुन्हा सासरी घेऊन आले आणि या प्रश्नाची तड लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ग्रामपंचायतीचा फैसला हे प्रकरण ग्रामपंचायतीत गेल्यावर दोघांचीही बाजू ऐकून घेण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूंचे नातेवाईक हजर होते. दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर ग्रामपंचायतीनं फैसला सुनावला. यावेळी सुनील आणि नेहा यांनी वेगळं व्हावं आणि आपल्याला जे हवंय ते करावं, असा निर्णय ग्रामपंचायतीनं दिला. या दोघांमध्ये यापुढे वैवाहिक संबंध राहणार नसून नेहा आपलं शिक्षण पूर्ण करायला स्वतंत्र आहे, असा फैसला ग्रामपंचायतीनं दिला. हे वाचा -धक्कादायक! महाराष्ट्रात चार तासात अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून गँगरेप केंद्र सरकारकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारखी मोहिम राबवली जात असताना दुसरीकडे मात्र शिक्षणासाठी मुलींना आजही किती संघर्ष करावा लागतो, हेच या घटनेतून दिसून आलं.
  Published by:desk news
  First published: