देव तारी त्याला कोण मारी! आई-बाबांनी बॅगेत पॅक करुन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडलेल्या लेकीचं नशीब फळफळलं

देव तारी त्याला कोण मारी! आई-बाबांनी बॅगेत पॅक करुन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडलेल्या लेकीचं नशीब फळफळलं

या नवजात मुलीला पॉलिथिनमध्ये पॅककरुन एका कचाऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून देण्यात आलं होतं.

  • Share this:

मेरठ, 26 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut) येथील शताब्दी नगरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात बाळ अडॉप्ट करण्यासाठी (Adoption) खूप जणं पुढे आले आहेत. नवजात मुलीला तिच्या आई-वडिलांनी एका बॅगमध्ये पॅक करून मरण्यासाठी सोडून दिलं होतं. सुदैवाने तातडीने रुग्णालयात नेल्याने तिचा जीव वाचला. आता त्या छकुलीला दत्तक घेण्यासाठी खूप जणं पुढे आले आहेत. कचऱ्याच्या ढिकाऱ्यात दिसलेल्या या मुलीला दत्तक घेण्यासाठी 15 कुटुंब समोर आले आहेत. या मुलीला वाचविण्यासाठी चाइल्डलाइनची (Childline) महत्त्वाची भूमिका आहे.

लोक प्रार्थना करीत आहेत

ही मुलगी त्यांनाच दत्तक मिळावी अशी प्रार्थना अनेक कुटुंब करीत आहेत. पोलिसांचं पथक नवजात बाळाला कचऱ्याच्या ढिकाऱ्यात सोडून गेलेल्या पालकांचा शोध घेत आहेत. सध्या ही मुलगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु अद्यापही तिला क्रिटीकल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं आहे.

हे ही वाचा-पत्नीचं कारण देत तरुणाने स्वत:च गुप्तांगचं कापलं; त्याच ब्लेडने गळ्यावर केले वार

चाइल्डलाइनने मुलीला वाचवलं

एकीकडे, क्रूर पालकांनी मुलीला पॉलिथिनमध्ये कचर्‍यासारखे पॅक केले आणि ते मरण्यासाठी घाणीच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. तर दुसरीकडे मुलीचे प्राण वाचविण्यासाठी चाइल्डलाइनने खूप कष्ट घेतले. आणि तिला वेळेत रुग्णालयात नेलं. आता मुलीला पूर्वीपेक्षा बरं वाटत आहे. नवजात मुलीला पॉलिथीनमध्ये पॅक केल्यानंतर तिला श्वास घ्यायला किती त्रास झाला असेल? याची कल्पनाही करवत नाही. मात्र मुलीच्या रडण्याच्या आवाजाने काहींनी चाइल्डलाइनशी संपर्क साधला व तिला वाचवणे शक्य झाले. मात्र या प्रकरणात ज्या पालकांनी आपल्या मुलीला मरणासाठी बॅगेत पॅक करुन सोडलं होतं, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. सुदैवाने वेळेत मुलीला रुग्णालयात नेल्याने तिची जीव वाचला, नाहीतर देशात पुन्हा एका लेकीचा जीव गेला असता.

Published by: Meenal Gangurde
First published: November 26, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या