मराठी बातम्या /बातम्या /देश /माणुसकी अजूनही जिवंत! झुडपात आढळलं बेवारस अर्भक; पोलिसाच्या पत्नीने स्तनपान करून वाचवला जीव

माणुसकी अजूनही जिवंत! झुडपात आढळलं बेवारस अर्भक; पोलिसाच्या पत्नीने स्तनपान करून वाचवला जीव

पोलिसाच्या पत्नीने स्तनपान करून वाचवला जीव

पोलिसाच्या पत्नीने स्तनपान करून वाचवला जीव

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एक नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळले. यावेळी एसएचओच्या पत्नीने स्तनपान करून त्यांचे प्राण वाचवले.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नोएडा, 24 डिसेंबर : सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणालाही कोणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. दिवसेंदिवस माणुसकी नाहीशी होत चालली आहे, अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळत आहे; मात्र त्याला अपवाद ठरतील अशा काही गोष्टीही घडत असतात. ग्रेटर नोएडातल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने अशाच एका सत्कृत्यातून एक आदर्श घालून दिला आहे. दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडामध्ये पोलिसांना एका झुडपात नवजात अर्भक सापडलं होतं. पोलीस स्टेशनमधल्या एसएचओच्या पत्नीने या भुकेल्या बाळाला आपलं दूध पाजून त्याचे प्राण वाचवले आहेत. 'नवभारत टाइम्स'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    20 डिसेंबर रोजी पोलिसांना ग्रेटर नोएडातल्या नॉलेज पार्क परिसरातल्या झुडपात एका नवजात अर्भक रडत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा एका कापडामध्ये गुंडाळलेलं नवजात अर्भक आढळलं. तीव्र थंडीमुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं; पण भुकेमुळे बाळ खूप रडत होतं. आईचं दूधच मुलाला शांत करू शकतं, हे पोलिसांना माहीत होतं; पण याबाबत ते काहीही करू शकत नव्हते.

    वाचा - कोणत्याही क्लासविना UPSCमध्ये तरुणीची कमाल! पहिल्याच प्रयत्नात बनली IPS

    याची माहिती पोलीस स्टेशनचे एसएचओ सिंह यांच्या पत्नीला मिळाली. ज्योती सिंह यांनी बाळाला स्वतःचं दूध पाजण्याची इच्छा व्यक्त केली. ज्योती यांनी बाळाला स्तनपान करवल्यानंतर बाळाचं रडणं थांबलं. या नवजात मुलीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती सुधारत असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पोलीस बाळाच्या पालकांचा शोध घेत आहेत; मात्र अद्याप काहीही तपास लागलेला नाही.

    ज्योती सिंह यांनी सांगितलं की, 'शारदा हॉस्पिटलजवळच्या झाडीत कोणी तरी हे बाळ सोडून गेलं होतं. त्याला भूक लागली होती, त्यामुळे ते रडत होतं. मी त्याला दूध पाजण्याचा निर्णय घेतला. नवजात बाळाशी कुणी इतक्या निर्दयपणे कसं वागू शकतं, असा प्रश्न मला पडला आहे.' त्या म्हणाल्या, "माझी सर्वांना एक विनंती आहे. कोणाला आपल्या मुलांची काळजी घेण्यात अडचण असेल तर त्यांनी अनाथाश्रम किंवा एनजीओसारख्या सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे. आपली मुलं तिथे दिली पाहिजेत, जेणेकरून त्यांची काळजी घेतली जाऊ शकते."

    काही महिन्यांपूर्वी, राजस्थानमधल्या कोटा इथल्या सारथल पोलीस स्टेशनमधल्या दोन महिला कॉन्स्टेबल्सनी अशाच प्रकारे एका नवजात मुलीला स्वत:चं दूध पाजलं होतं. ही मुलगी दारूच्या नशेत असलेल्या वडिलांजवळ जंगलात सापडली होती.

    First published:
    top videos

      Tags: Police, Uttar pardesh