झारग्राम (कोलकाता), 25 जानेवारी : पश्चिम बंगालच्या झारग्राम राज्यात एका नवजात बालकाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात बालकाच्या जन्मानंतर त्याच्या घरी तृतीथपंथीय आले होते, त्यांनी बाळाला आईच्या मांडीवरून खेचून पैशांची मागणी केली. तर, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, उत्तर शिल्दा येथे राहणाऱ्या चंदन खिलाडी यांनी जुळे झाले होते. मात्र हृदयाच्या समस्येमुळे एका मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वाचा-सनी लिओनीसोबत रोमान्स करताना दिसणार Bigg boss 13चा हा स्पर्धक
दरम्यान, जन्माच्या 20 दिवसानंतर रुग्णालयातून नवजात बालकाला घरी आणण्यात आले. ही बातमी कळल्यानंतर तीन तृतीयपंथीय त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी 11,000 रुपये मागितले आणि नकार दिल्यास त्यांनी कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
वाचा-VIDEO : पंतच्या करिअरला लागला सुरुंग! सामन्यानंतर राहुलनेच उडवली ऋषभची खिल्ली
आईच्या कुशीतलं बाळ खेचून करू लागले डान्स
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीयांनी आईच्या मांडीवरून नवजात बालकाला उचलून नाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुटुंबियांनी 2 हजार रुपये देण्यात होकार दिला. यानंतर पुन्हा नवजात बालक आजारी पडला, त्यामुळं त्याला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी बालकास मृत घोषित केले. ही बातमी शहरात पसरल्यानंतर लोकांनी तृतीथपंथीयांना मारण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी त्यांची सुटका करत त्यांना ताब्यात घेतले आहे.
वाचा-CAA च्या विरोधात वाद चिघळला; 75 वर्षांच्या वृद्धाने भर चौकात स्वत:ला जिवंत जाळलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.