न्यूझीलंड दूतावासानं ऑक्सिजनसाठी काँग्रेसकडे मागितली मदत; ट्रोल होताच डिलीट केलं Tweet

न्यूझीलंड दूतावासानं ऑक्सिजनसाठी काँग्रेसकडे मागितली मदत; ट्रोल होताच डिलीट केलं Tweet

न्यूझीलंड दूतावासाने केलेल्या ट्विटवरून सध्या वाद सुरू झाला आहे. सरकार काय करत आहे, परदेशी दूतावासांनाही विरोधी नेत्यांकडून मदत मागावी लागते, असे म्हणत काहींनी याविषयी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 मे: न्यूझीलंड दूतावासाने (New Zealand Embassy in India) रविवारी ऑक्सिजन सिलिंडरसाठी काँग्रेस नेत्याकडे मागणी केल्याचा प्रकार समोर आला. यासंबंधी न्यूझीलंड दूतावासाने एक ट्विटदेखील केले होते. मात्र, या प्रकारावरून सरकारच्या कामावर काहींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर दूतावासाकडून हे ट्विट डिलीट करण्यात आले. दूतावासाकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, याविषयी चुकून ट्विट केलं गेलं होतं.

न्यूझीलंडच्या दूतावासात आपण ऑक्सिजन सिलिंडर पाठवून त्वरित मदत करू शकता का? धन्यवाद, असे ट्विट न्यूझीलंडच्या दूतावासाने रविवारी सकाळी केले. या ट्विटमध्ये दूतावासाने ऑक्सिजन सिलिंडरसंदर्भात युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही श्रीनिवास (National President of Youth Congress BV Srinivas) यांना मदत मागितली. या ट्विटमध्ये त्यांनी दूतावासातील काँग्रेसच्या एसओएस ट्विटर अकाउंटलाही टॅग केले होते.

या ट्विटवरून सध्या वाद सुरू झाला आहे. सरकार काय करत आहे, परदेशी दूतावासांनाही विरोधी नेत्यांकडून मदत मागावी लागते, असे म्हणत काहींनी याविषयी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला. हा वाद होताच न्यूझीलंडच्या राजदूताने हे ट्विट हटवून नवीन ट्विट केले. नवीन ट्विटमध्ये दूतावासाने लिहिले की, "ऑक्सिजन सिलिंडरची त्वरित व्यवस्था करण्यासाठी आम्ही सर्व स्त्रोतांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यामध्ये आम्ही एक चूक केली, ज्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत."

न्यूझीलंड दूतावासाने मदतीचे आवाहन केल्यानंतर काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी ऑक्सिजन सिलिंडर त्यांना मिळवून दिला. यापूर्वी शनिवारी रात्री काँग्रेसने फिलिपिन्सच्या दूतावासालाही ऑक्सिजन सिलिंडर पुरविला होता. मात्र, परराष्ट्र दूतावासात ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवल्यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

हे वाचा - Explainer : सौम्य आणि लक्षणं नसणाऱ्या रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये कशी काळजी घ्याल? नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर

काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी या मुद्द्यावरून परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विट केले की, "एक भारतीय नागरिक म्हणून मी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांचे आभार मानतो. परराष्ट्र दूतावास विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे मदत मागतात, हे पाहून मला आश्चर्य वाटले. परराष्ट्र मंत्रालय काय झोपा काढत आहे काय?"

हे वाचा - ‘मी सावध केलं होतं पण….’ Coronavirus विषयी राहुल गांधींचा मोदींवर मोठा आरोप

यावर परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विट करून काँग्रेसवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, "फिलिपिन्स दूतावासात परराष्ट्र मंत्रालयाने चौकशी केली. तेथे कोरोनाबाधित कोणही रुग्ण नाही, विनाकारणच ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. खालच्या पातळीवरचे राजकारण कोण करीत आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे. सध्याच्या काळात लोकांना सिलिंडर्सची नितांत गरज असते तेव्हा अनावश्यक सिलिंडरचे वितरण करणे भयानक आहे.

Published by: News18 Desk
First published: May 2, 2021, 2:47 PM IST

ताज्या बातम्या