भयानक! विमानावर कोसळली वीज अंगावर काटा आणणारा PHOTO VIRAL

भयानक! विमानावर कोसळली वीज अंगावर काटा आणणारा PHOTO VIRAL

विमानावर वीज कोसळतानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर फोटो व्हायरल.

  • Share this:

क्राइस्टचर्च 22 नोव्हेंबर: सोशल मीडियावर एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. एमिरेट्स A-380 विमानावर वीज कोसळत असल्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॉयटर्स या वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडमध्ये आलेल्या तुफान वादळाचा फटका विमानसेवेलाही बसला. वादळामुळे क्राइस्टचर्च इथल्या विमानतळावर विमान थांबवण्यात आलं होतं. यावेळी विमानातील प्रवासी वेटिंगरुममध्ये बसले होते. त्यावेळी बाहेर विजा चमकत होत्या. सगळे प्रवासी वादळ शमण्याची वाट पाहात होते. दरम्यान यावेळी वीज चमकत असताना एका प्रवाशानं त्याच्या कॅमेऱ्यात हा फोटो क्लिक केला आहे.

डॅनियल करी नावाच्या तरुणाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो भयानक असल्याचं त्यानं म्हटलं आहे. न्यूझीलंडमधील काही भागांमध्ये बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी विश्रामगृहात असलेल्या एका प्रवाशानं वीज कोसळतानाचं दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आहे. हे छायाचित्र पाहून विमानावर वीज कोसळत असल्यासारखं वाटतं आहे. अप्रतिम आणि तितकाच अंगावर काटा आणणारा फोटो असल्याचं छायाचित्र काढणारे डॅनियल करी यांनी म्हटलं आहे. रॉयटर्स या वृत्त संस्थेनं यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता.

हा व्हिडिओ पाहून न्यूझीलंडमधील काही भागांना किती मोठा वादळाचा तडाखा बसला असेल याची कल्पना करू शकता. क्राइस्टचर्च आंतरराष्ट्रीय विमानतळासह बाजूच्य भागांमध्ये प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1500हून अधिकवेळा वीजांचा कडकडाट झाल्याची माहिती समोर आली आहे. तर काही ठिकाणी घर आणि कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.

First Published: Nov 22, 2019 01:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading