ट्रेन तिकिटांबद्दल रेल्वे आणणार 'हा' नवा नियम, प्रवाशांसाठी स्टेशनवर जास्त सुरक्षा

रेल्वे स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मोठं पाऊल उचललं जातंय.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 08:27 PM IST

ट्रेन तिकिटांबद्दल रेल्वे आणणार 'हा' नवा नियम, प्रवाशांसाठी स्टेशनवर जास्त सुरक्षा

मुंबई, 07 जून : रेल्वे स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मोठं पाऊल उचललं जातंय. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता रेल्वे स्टेशनवर विमानतळासारखी एंट्री आणि एक्झिटची व्यवस्था केली जाणार आहे. सर्व रेल्वे स्टेशनवर wifi सेवा दिली जाईल. A1 कॅटेगरींच्या रेल्वे स्टेशन्सना अत्याधुनिक केलं जाईल. 100 दिवसांच्या अजेंड्यामध्ये सूरत, रायपूर, दिल्ली, रांची यांचा समावेश आहे.

रेल्वेचा नवा प्लॅन - नो तिकीट, नो एंट्री

रेल्वे स्टेशन्सवर विमानतळासारखी सुविधा

रेल्वेनं नवा प्लॅन तयार केलाय

सर्व A आणि A1 कॅटेगिरीच्या स्टेशन्सवर आॅटोमेटेड गेट असतील

Loading...

तिकिटाशिवाय कुणी रेल्वे स्टेशनात येऊ शकणार नाही

पोस्टात पैसे गुंतवायचेत? 'या' आहेत फायदेशीर योजना

याची सुरुवात हबीबगंज आणि गांधीनगर रेल्वे स्टेशनात लागू केली जाईल

त्यानंतर मुंबई आणि दिल्ली स्टेशन्सवरही ही सोय सुरू होईल

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीनं गर्लफ्रेंडसाठी घेतलं 552 कोटींचं घर, पाहा VIDEO

विमानतळासारख्या सुरक्षेसाठी आरपीएफ कमांडोंना सीआयएसएफ कमांडोसारखं प्रशिक्षण दिलं जाईल

रेल्वेसाठी 115 कोटी रुपये दिले गेलेत.

BHEL मध्ये 2.8 लाख पगारापर्यंतच्या 24 व्हेकन्सीज्, 'असा' करा अर्ज

भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता सरकार मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. सरकार राजधानी आणि शताब्दी ट्रेन या चालवण्यासाठी खासगी कंपन्यांकडे देण्य़ाची शक्यता आहे. तसंच, प्रीमियम ट्रेनचं कंत्राट देखील सरकार खासगी कंपन्यांना देणार आहे. रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकार हे पाऊल उचलणार आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री पियुष गोयल काय भूमिका जाहीर करणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

देशात सर्वात मोठं जाळं हे रेल्वेचं आहे. लाखो प्रवासी दरदिवशी रेल्वेतून प्रवास करतात. यावेळी प्रवाशांनी अनेक तक्रारी देखील केलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा सुधारण्यासाठी सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान खानपानाबद्दल देखील प्रवाशांच्या तक्रारी येतात. त्यावर उपाय म्हणून सरकार हे पाऊल उचलणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी रेल्वे बजेटमध्ये याची घोषणा होणार का? याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.


VIDEO : मुख्यमंत्री फडणवीस इन अ‍ॅक्शन, जिल्हा बँकांना दिली तंबी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: railway
First Published: Jun 7, 2019 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...