Home /News /national /

New Wage Code: 1 जुलैपासून मिळणार आठवड्यातून 3 दिवस सुट्टी; पगार, PF बाबतच्या नियमांमध्येही मोठे बदल

New Wage Code: 1 जुलैपासून मिळणार आठवड्यातून 3 दिवस सुट्टी; पगार, PF बाबतच्या नियमांमध्येही मोठे बदल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सरकारी कर्मचारी, तसंच ऑफिस, मिल अशा ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आठवड्यातले कामाचे दिवस (Working Days), पगाराचे स्वरूप (Salary Structure) आणि पीएफबद्दलच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.

    मुंबई, 25 जून : सरकारी कर्मचारी, तसंच ऑफिस, मिल अशा ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच नवीन वेतन संहिता (New Wage Code India) लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे आठवड्यातले कामाचे दिवस (Working Days), पगाराचे स्वरूप (Salary Structure) आणि पीएफबद्दलच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यापूर्वी ही वेतन संहिता एप्रिल महिन्यात लागू होणार होती; मात्र काही राज्य सरकारांनी तयारी न दर्शवल्यामुळे तेव्हा हे शक्य झालं नाही. 'झी न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार आता एक जुलैपासून ही नवी वेतन संहिता लागू होण्याची शक्यता आहे. नव्या वेतन संहितेत काय आहे? नव्या वेतन संहितेमध्ये ऑफिसमधले नोकरदार, मील आणि फॅक्टरीजमध्ये काम करणारे कर्मचारी या सर्वांसाठी विविध प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारापासून, त्यांच्या सुट्ट्या, तसंच कामाचे तास या सर्व गोष्टींमध्ये नव्या संहितेनुसार बदल होणार आहे. कोणत्या आहेत या तरतुदी (Provisions in New Wage Code) आणि नेमका काय होईल बदल, हे जाणून घेऊ या. वार्षिक सुट्ट्यांमध्ये वाढ कामगार संहितेच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत कामगार मंत्रालय, कामगार संघटना आणि उद्योग जगतातले प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली होती. यानुसार, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये वाढ (Increase in Earned Leaves) करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या एका वर्षातल्या रजेची संख्या (Earned Leaves) 240 वरून 300 करण्यात येणार आहे. आठवड्याचे कामाचे दिवसही कमी नव्या वेतन संहितेनुसार, आठवड्यातले कामाचे तास (Working hours according to New Wage Code) पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत; पण, कंपनीला दिवसाचे कामाचे तास बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. म्हणजेच, एका कर्मचाऱ्याचे आठवड्याचे कामाचे तास 48 असणार आहेत. एखादी कंपनी कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे कामाचे तास 12 ठेवत असेल, तर त्या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी (Working Days as per New Wage Code) द्यावी लागेल. तसंच, एखादी कंपनी कर्मचाऱ्यांना दररोज 8 तास काम करण्यास सांगत असेल, तर ते आठवड्याला एक दिवस सुट्टी देऊ शकतात. अशा प्रकारे दैनंदिन कामाच्या तासांनुसार ते सुट्टी ठरवू शकतात. अर्थात, यासाठी कर्मचाऱ्यांची अनुमती असणं गरजेचं आहे. एखाद्या कर्मचार्‍याने आठवड्यामध्ये 48 तासांपेक्षा जास्त काम केलं, तर त्याला ओव्हरटाइम दिला जाईल. सॅलरी स्ट्रक्चर बदलणार नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये (Changes in Salary Structure) बदल होणार आहे. वेतन संहिता कायद्यानुसार (Wage Code Act, 2019) कोणत्याही कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी सीटीसीच्या (Cost to Company - CTC) 50 टक्क्यांहून कमी असता कामा नये. तसंच, कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर भत्ते सीटीसीच्या 50 टक्क्यांहून (Allowances and Basic Salary ratio) अधिक असता कामा नयेत. सध्या कित्येक कंपन्या सीटीसीच्या तुलनेत अगदी 25-30 टक्के बेसिक सॅलरी (Basic Salary) ठेवतात आणि इतर रक्कम भत्त्यांच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना देतात. नव्या नियमामुळे असं करता येणार नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास, तुमचा मासिक पगार 50 हजार रुपये असेल, तर नवीन नियमानुसार तुमची बेसिक सॅलरी 25,000 रुपये असायला हवी आणि उर्वरित 25 हजार एचआरए (HRA), पीएफ (PF), ग्रॅच्युइटी, पेन्शन अशा भत्त्यांच्या स्वरूपात देण्यात यावेत. झोपल्या झोपल्या करू शकता बऱ्याच आजारांवर मात; कोणत्या समस्येसाठी कसं झोपायचं पाहा बेसिक सॅलरी कमी ठेवल्यामुळे कंपन्यांना फायदा होत होता. आता पगाराच्या निम्मी बेसिक सॅलरी ठेवण्याची सक्ती (Basic Salary should be 50 percent to CTC) करण्यात आल्यामुळे कंपन्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यांमध्ये कपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात मिळणारा पगार कमी होऊ शकतो.
    First published:

    पुढील बातम्या