भाजपची यादी जाहीर, पाहा स्मृती इराणींच्या नावापुढे काय लिहिलंय

सत्ताधारी भाजपने होळीच्या दिवशी लोकसभेसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण...

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 11:06 PM IST

भाजपची यादी जाहीर, पाहा स्मृती इराणींच्या नावापुढे काय लिहिलंय

नवी दिल्ली, 21 मार्च : सत्ताधारी भाजपने होळीच्या दिवशी लोकसभेसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी 20 राज्यातील 182 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात राजस्थान, ओडीशा, मिझोराम, लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, दादर-नगर हवेली, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, आसाम, अंदमान-निकोबार, गुजरात या राज्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या: भाजपची पहिली यादी जाहीर; PM मोदी वाराणसीतून, अडवाणींचा पत्ता कट

लोकसभा 2019: गडकरी, दानवेंसह महाराष्ट्रातले हे उमेदवार झाले फायनल

सुजय विखे पाटील यांना भाजपकडून नगरमधून उमेदवारी

अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून, नागपूरमधून नितीन गडकरी तर लखनऊमधून राजनाथ सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमेठीमधून 2014च्या उमेदवार स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण यादीत त्यांच्या नावापुढे पारसी असे लिहण्यात आले आहे. भाजपने यादीत अन्य कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे जातीचा उल्लेख केला नाही. त्यामुळे इराणी यांच्या नावापुढे जातीचा उल्लेख केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading...
दरम्यान, इराणी यांच्या नावा पुढे जातीचा उल्लेख झाला आहे ही बाब समोर आल्यानंतर भाजपने जातीचा उल्लेख काढून टाकत यादी दुरुस्त करून पुन्हा जाहीर केली. अर्थात तोपर्यंत जातीचा उल्लेख असलेली यादी सर्वांपर्यंत पोहोचली होती.


पाहा भाजपची यादी जशी आहे तशी क्लिक करा> 1st PRESS RELEASE of Lok Sabha Election 2019 on 21.03


VIDEO : 'खासदार व्हायचं म्हणून जमीन विकली'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 08:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...