S M L

भाजपची पहिली यादी जाहीर; PM मोदी वाराणसीतून, अडवाणींचा पत्ता कट

सत्ताधारी भाजपने लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे.

Updated On: Mar 21, 2019 09:18 PM IST

भाजपची पहिली यादी जाहीर; PM मोदी वाराणसीतून, अडवाणींचा पत्ता कट

नवी दिल्ली, 16 मार्च: सत्ताधारी भाजपने लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत देशातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. याआधीच भाजपने लोकसभे सोबत होणाऱ्या काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी 20 राज्यातील 182 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्त्वाचे उमेदवार


वाराणसी- नरेंद्र मोदी

गांधीनगर- अमित शहा

लखनऊ- राजनाथ सिंह

Loading...

नागपूर- नितीन गडकरी

अमेठी- स्मृती इराणी

हे देखील वाचा: लोकसभा 2019: भाजपने महाराष्ट्रातून यांना दिली उमेदवारी


भाजपची यादी जाहीर, पाहा स्मृती इराणींच्या नावापुढे काय लिहिलंय


Loksabha election 2019 ...म्हणून गांधीनगरमधून अडवानी नव्हे तर शहा लढणार


लोकसभा निवडणुक 2019


लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.


11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-


वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम


18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-


बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर


23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान


जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले


29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान


नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी


लोकसभा निवडणूक 2014


महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.


महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल


एकूण जागा 48


भाजप 23


सेना 18


राष्ट्रवादी काँग्रेस 4


काँग्रेस 2


स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1


VIDEO : 'खासदार व्हायचं म्हणून जमीन विकली'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 07:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close