News18 Lokmat

रोहित तिवारी हत्या प्रकरणाला नवीन वळण, पत्नी पोलिसांच्या ताब्यात

उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांचा 16 एप्रिलला संशयास्पद मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 07:43 AM IST

रोहित तिवारी हत्या प्रकरणाला नवीन वळण, पत्नी पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली, 22 एप्रिल : उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांचा 16 एप्रिलला संशयास्पद मृत्यू झाला. आता या प्रकरणाला वेगळंच वळण प्राप्त झालं आहे. रविवारी (21 एप्रिल) पोलिसांनी रोहित यांची पत्नी अपूर्वा तिवारी आणि घरात काम करणाऱ्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हत्याकांड प्रकरणात त्यांच्या पत्नीचा सहभाग असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. पोलीस मुख्य आरोपी म्हणून अपूर्वाकडे पाहत आहेत. यासंदर्भात शनिवार (20 एप्रिल) रात्रीदेखील क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अपूर्वा यांची जवळपास 8 तास चौकशी केली.

दरम्यान रोहित यांच्या आई उज्ज्वला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रोहित आणि अपूर्वा यांचे नातेसंबंध चांगले नव्हते. रोहित आणि अपूर्वाचे सतत वाद होत असत, त्यामुळे तो तणावात होता.  लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच शेखर आणि अपूर्वामध्ये वादविवाद सुरू होते.रोहितची हत्या माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे'.

दुसरीकडे, रोहित यांचा मृत्यू नैसर्गिक नसून नाक, तोंड आणि गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती पोस्टमार्टेम अहवालात समोर आली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

वाचा अन्य बातम्या

मोदी, पवारांसह दिग्गज मैदानात, कुणाची किती वाजता सभा?

Loading...

SPECIAL REPORT : गोपाळ शेट्टींसमोर उर्मिला मार्तोडकर यांचं आव्हान

बॉम्बस्फोटाच्या कटाची माहिती असूनही पोलीस निष्क्रीय; श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा गौप्यस्फोट

VIDEO : पंतप्रधान मोदींना अजित पवारांनी काढला चिमटा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 07:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...