IPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..आई मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचा दावा

IPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..आई मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचा दावा

IPS अधिकाऱ्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : गर्लफ्रेंडच्या फ्लॅटवर पकडणे आणि पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरुषोत्तम शर्मा यांना सरकारने निलंबित करण्यापूर्वी त्यांची मुलगी बचाव करण्यासाठी समोर आली आहे. विवाहित मुलीने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना चिठ्ठी लिहून वडिलांविरोधात कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली आहे. मुलीने या पत्रात लिहिलं आहे की, त्यांच्या आईची मानसिक स्थिती ठीक नाही. मुलीने हे पत्र मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याचे गृहमंत्री आणि डीजीपी यांना पाठवलं आहे.

मुलीने पत्रात लिहिलं आहे की, आईची मानसिक स्थिती ठीक नाही, त्यामुळे तिच्या वडिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दैनिक भास्करने दिलेल्या बातमीनुसार मुलीने दावा केला आहे की, वडिलांवर लावलेले आरोप चुकीचे आहे. तिने या प्रकरणात वडिलांची मदत करण्याचं अपील केलं आहे.

रविवारी आयपीएस पुरुषोत्तम शर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने त्यांना पदावरुन निलंबित करीत गृह विभागाकडे सुपूर्द केलं होते. गृह विभागाने व्हायरल व्हिडीओबाबत त्यांना नोटीस पाठवली होती. राज्य महिला आयोगाने शर्मा यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मात्र मुलीने पाठवलेल्या या पत्रानंतर आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. काल त्यांचा मुलानेही हा व्हिडीओ मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला होता. आणि वडिलांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी अद्याप या प्रकरणात तक्रार दाखल केलेली नाही. तर दुसरीकडे मुलीने वडिलांना पाठिंबा दिला आहे.  अद्याप या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. भोपाळ पोलिसांनी दोन वेळा शर्मा यांची पत्नी प्रिया शर्मा हिच्यासोबत संपर्क केला आहे. मात्र त्यांनी तक्रार करण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे शर्मा ज्या महिलेसोबत फ्लॅममध्ये पकडले गेले त्या महिलेने शर्मा यांची पत्नी आणि मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे मानहानी झाली असून नोकरीवरही टांगती तलवार असल्याचे त्या महिलेने म्हणणे आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 29, 2020, 10:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या