हेल्मेट घातलं नाही तर लायसन्स रद्द होणार, जाणून घ्या ट्रॅफिकचे नवे 19 नियम

वाहतुकीचे हे नियम मोडले तर जबर दंड होऊ शकतो. ड्रायव्हिंगचा परवाना हवा असेल तर त्यासाठीही काटेकोर निकष लावण्यात येणार आहेत. जर कुणी अल्पवयीन मुलाने किंवा मुलीने गाडी चालवताना अपघात घडला तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना 3 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा होईल.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 07:11 PM IST

हेल्मेट घातलं नाही तर लायसन्स रद्द होणार, जाणून घ्या ट्रॅफिकचे नवे 19 नियम

मुंबई, 27 ऑगस्ट : आता वाहन चालवताना बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे.वाहतुकीचे नियम बदलून नवे नियम लागू करण्यासाठीच्या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे. वाहतुकीचे हे नियम मोडले तर जबर दंड होऊ शकतो. ड्रायव्हिंगचा परवाना हवा असेल तर त्यासाठीही काटेकोर निकष लावण्यात येणार आहेत. जर कुणी अल्पवयीन मुलाने किंवा मुलीने गाडी चालवताना अपघात घडला तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना 3 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा होईल. त्याचबरोबर त्या वाहनाची नोंदणीही रद्द करण्यात येईल.

नव्या नियमांनुसार, आपत्कालीन वाहनांना रस्ता दिला नाही किंवा अपात्र असाताना गाडी चालवली तर 10 हजार रुपये दंड होऊ शकतो. सीट बेल्ट लावला नाही तरीही मोठा दंड होईल. भरधाव वेगाने गाडी चालवली तर एक हजार रुपयापासून 2 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

हे आहेत नवे नियम

1. विनातिकीट प्रवास केला तर 500 रु. दंड पडेल.

2. अधिकाऱ्यांचा आदेश मानला नाही तर 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

Loading...

3. लायसन्स नसताना गाडी चालवली तर 5 हजार रुपयांचा दंड

4. अपात्र होऊन वाहन चालवल्यास 10 हजार रु. दंड

5. भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांना 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

6. धोकादायक पद्धतीने वाहन चालवलं तर 5 हजार रुपयांचा दंड

7. दारू पिऊन गाडी चालवली तर 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

8. स्पीडिंग किंवा रेसिंग केलं तर 5 हजार रुपयांचा दंड आहे.

9. परवाना नसताना वाहन चालवलं तर 10 हजार रुपयांचा दंड

10. लायसन्सचे नियम तोडले तर 25 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतची तरतूद आहे.

RBI कडे कोट्यवधी रुपये येतात कुठून? जाणून घ्या या 4 गोष्टी

11. वाहनात जास्त सामान भरलं तर 2 हजार रुपयांहून जास्त दंडाची तरतूद आहे.

12. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतील तर एका पॅसेंडरला एक हजार रुपये असा दंड पडेल.

13. सीटबेल्ट लावला नाही तर 1 हजार रुपयांचा दंड आहे.

14. स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती असल्या तर 2 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं.

15. हेल्मेट घातलं नाही तर 1 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होण्याची शिक्षा

16. अँब्युलन्ससारख्या इमर्जन्सी वाहनांना रस्ता दिला नाही तर 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.

असे व्हा श्रीमंत : रोज 50 रु. वाचवा आणि 10 लाख रुपये मिळवा

17. इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवलं तर 2 हजार रुपयांचा दंड पडेल.

18. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात झाला तर त्यांच्या पालकांना दोषी ठरवलं जाईल. वाहनाची नोंदणीही रद्द होईल.

19. अधिकाऱ्यांना ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत.

=========================================================================================================

VIDEO : माल तोच पॅकजिंग वेगळं, सुप्रिया सुळेंचा गयारामांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 07:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...