ट्राफिकच्या नव्या नियमामुळे वाढले 'या' चोरीचे प्रकार, पाहा महिलेनं काय केलं

ट्राफिकच्या नव्या नियमामुळे वाढले 'या' चोरीचे प्रकार, पाहा महिलेनं काय केलं

नवा वाहतूक कायदा लागू झाल्यानंतर अनेक ट्राफिक पोलिस आणि वाहन चालक यांच्यातील अनेक किस्से समोर आले आहेत. आता पावती फाडतील म्हणून चक्क हेल्मेटची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 07 नोव्हेंबर : नवा वाहतूक कायदा लागू केल्यापासून नियम मोडणाऱ्यांना मोठ्या रकमेचे दंड केले जात आहेत. यापासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या वाहनचालकांकडून लढवल्या जात आहेत. यातच आता हेल्मेट चोरीचा प्रकार वाढला आहे. बेंगळुरूतील फोरम मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये एक महिला हेल्मेट चोरी करताना सापडली. तिने ट्राफिक पोलिसांपासून वाचण्यासाठी हेल्मेट चोरी केली असली तरी ज्या सफाईदारपणे हेल्मेट चोरलं ते पाहून धक्काच बसतो. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेंगळुरुतील कोरामंगला इथं फोरममॉलमध्ये दोन मित्र चित्रपट बघायला आले होते. त्यांनी हेल्मेट गाडीला अडकवलं होतं. चित्रपट बघून बाहेर आल्यानंतर ते गाडीजवळ आल्यानंतर त्यांना हेल्मेट तिथं नसल्याचं दिसलं. सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकाकडे धाव घेतली. तिथंही काहीच माहिती मिळाली नाही.

सध्या नव्या नियमानुसार हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यास मोठ्या रकमेचा दंड होतो. त्यामुळे हेल्मेट न घेता गाडी चालवण्याचा धोका पत्करत नसल्याचं त्या युवकांनी सांगितलं. त्यांनी पोलिसांच्या मदतीने पार्किंगच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात हेल्मेट चोरी उघडकीस आली. एक महिला आली आणि तिने हेल्मेट चोरून नेलं. याप्रकऱणी युवकांकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

हेल्मेट चोरीबद्दल युवकाने पार्किगची व्यवस्था पाहणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. पार्किंगचे पैसे देऊनही हेल्मेटकडे लक्ष ठेवलं जात नाही अशं युवकाने म्हटलं आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, हेल्मेट नसल्याने दंड आकारला जातो याची भीती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच हेल्मेटची चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 11:21 AM IST

ताज्या बातम्या