पोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL

नव्या वाहतूक कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठ्या रकमेचे दंड करण्यात येत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 04:24 PM IST

पोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL

दिल्ली, 21 सप्टेंबर : नवा वाहतूक कायदा लागू झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यातही वाहनचालक आता कायद्याच्या पळवाटा शोधत आहेत. दरम्यान एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्राफीक पोलिसाने मोठी पावती फाडली तर कमी पैशात कसं सुटायचं. 15 मिनिटांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुमच्याकडे लायसन नसेल तर 5 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. नव्या नियमांमुले लोक रागात आहेत. या नियमांना विरोधही केला जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सुनिल संधू यांचा आहे. त्यांनी म्हटलं की, लायसन किंवा नोंदणी प्रमाणपत्रक नसेल तर 5 हजार रुपयांचा दंड आहे तर पीयूसी नसल्यास 10 हजार आणि विम्याची कागदपत्रे नसतील तर 2 हजार रुपयांची पावती फाडावी लागते.

तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला 100 रुपयांत सुटता येतं. त्यासाठी तुमच्याकडं 15 दिवसांची मुदत असते. या काळात तुम्ही कागदपत्रे सादर करून सुटू शकता. यासाठी फक्त 100 रुपये आकारले जातात असं सुनिल संधू यांनी सांगितले आहेत.

कागदपत्रांमध्ये ड्रायव्हिंग लायसन, नोंदणी प्रमाणपत्र, पीयुसी, विम्याची कागदपत्रे नसतील तर एकूण दंड 22 हजार रुपये होतो. जर तुम्ही 15 दिवसांत अधिकाऱ्यांना कागदपत्रं दाखवलीत तर फक्त 400 रुपये द्यावे लागतील असंही संधू म्हणाले.

Loading...

वाचा : दंड कसा करायचा? हेल्मेट नाही म्हणून अडवलं पण पोलिसांनाच पडला प्रश्न

कागदपत्रं विसरला असात तर जास्त पैसे भरण्यापासून तुम्ही वाचू शकता. ही प्रक्रीया थोडी किचकट आहे पण यामुळे विनाकारण मोठ्या रकमेचा दंड होण्यापासून सुटका होईल. फक्त कागदपत्रांपुरता हा नियम आहे. हेल्मेट नसताना किंवा दारुच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल होणाऱ्या दंडातून सुटका नाही.

VIDEO : सायकलस्वाराने मोडला नियम? जाणून घ्या ट्राफिक पोलिसांनी का अडवलं

VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...