'एबीटी' या अतिरेकी संघटनेकडून देशाला धोका

अतिरेकी संघटनांमध्ये आता भर पडलीये ती एबीटी म्हणजेच अन्सारउल्लाह बांगला टीमची.

Sonali Deshpande | Updated On: Mar 21, 2018 11:42 AM IST

'एबीटी' या अतिरेकी संघटनेकडून देशाला धोका

21 मार्च : भारताला अनेक परदेशी शत्रूंशी जसं सीमेवर लढावं लागतं तसंच ते भारताच्या भूमीवरही लढावं लागतंय. यात प्रामुख्यानं समावेश असतो तो दहशतवादी संघटनांचा.  या अतिरेकी संघटनामध्ये दिवसेंदिवस भर पडत चाललीये. सध्या नवीनच एक दहशतवादी संघटना भारतात आपले हातपाय पसरू पाहतेय.लष्कर ए तय्यबा...जैश ए महोम्मद... अल कायदा.. हिजबूल मुजाहीद्दीन अशा अतिरेकी संघटना आता सर्वांच्याच ओळखीच्या झाल्यात. या अतिरेकी संघटनांमध्ये आता भर पडलीये ती एबीटी म्हणजेच अन्सारउल्लाह बांगला टीमची.

एबीटी ही भारताचा नवीन शत्रू म्हणून उभी राहू पाहतेय. बांग्लादेशात या संघटनेवर बंदी घालण्यात आलीय. भारतात मात्र या संघटनेनं आपल्या कारवाया सुरू केल्यात. नुकतंच महाराष्ट्र एटीएसनं या संघटनेच्या पाच संशयीतांना पुण्यातून ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडे पॅन कार्ड आणि आधारकार्डसारखी खोटी ओळखपत्रंही मिळालीयेत. त्यामुळे एकच खळबळ माजलीय. यांच्या माध्यमातूनच एबीटी हळूहळू भारतात आपलं जाळं निर्माण करतेय.

कसं चालतं एबीटीचं काम ?

- एबीटी ही अल कायद्याची फ्रंट ऑर्गनायझेशन

- एबीटी ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखं काम करते

- प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगवेगळी टीम

- आयटी टीम, फायनान्स टीम, बैतूल मार्ग, दावा टीम

- बैतूल मार्ग म्हणजेच पैसे जमवणारी टीम

- दावा म्हणजे दावत देणारी म्हणजेच खाण्यापिण्याची काळजी घेणारी टीम

- एबीटी ही IED म्हणजेच इंप्रूव्हाइज्ड एक्सप्लोजीव डिव्हाईस

- एबीटीचा बॉम्ब बनवण्याचा आणि अतिरेकी कारवायांचा सक्सेस रेट हा 100 टक्के

- मुंबई, दिल्ली आणि कोलकत्यासारख्या काही शहरांची संघटनेकडून रेकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2018 11:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close