• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • बापरे! 'या' शहरात आला डेंग्यूचा नवा स्ट्रेन; अचानक रुग्णसंख्येत झाली वाढ; डॉक्टर म्हणतात...

बापरे! 'या' शहरात आला डेंग्यूचा नवा स्ट्रेन; अचानक रुग्णसंख्येत झाली वाढ; डॉक्टर म्हणतात...

डेंग्यूचे आतापर्यंत 410 रुग्ण आढळले असून, अज्ञात प्रकारच्या तापाच्या रुग्णांची संख्या हजारांत आहे.

 • Share this:
  जबलपूर, 14 सप्टेंबर: : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कहर अद्याप ओसरलेला नसतानाच अन्य काही आजारांनीही डोकं वर काढलं आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) डेंग्यूने थैमान घातलं आहे. चिंतेची बाब म्हणजे कोरोना विषाणूप्रमाणेच डेंग्यूही (New Strain of Dengue) रूप बदलत असून, डेंग्यूच्या नव्या स्ट्रेनमुळे (Dengue) सर्वांची चिंता वाढली आहे. जबलपूरमध्ये डेंग्यूचे आतापर्यंत 410 रुग्ण आढळले असून, अज्ञात प्रकारच्या तापाच्या रुग्णांची संख्या हजारांत आहे. सध्याच्या पावसाळ्याच्या हंगामात मध्य प्रदेशात (MP) डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. जबलपूरमध्ये (Jabalpur) डेंग्यूचे 410 रुग्ण आढळले असून, ज्यांचे डेंग्यूचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, त्या रुग्णांमध्येही डेंग्यूची लक्षणं स्पष्टपणे दिसत आहेत, ही चिंतेची गोष्ट आहे. डेंग्यूबाधित रुग्णाच्या शरीरातली प्लेटलेट्सची (Platelets) संख्या झपाट्याने कमी होत जाते आणि त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णाची स्थिती गंभीर होते. जबलपूरमध्ये मात्र असेही अनेक रुग्ण आढळले आहेत, की ज्यांच्यामध्ये केवळ व्हायरल तापाची लक्षणं दिसत आहेत; मात्र त्यांच्या प्लेटलेट्सची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. या प्रकारामुळे डॉक्टर्सही चिंतेत आहेत. जबलपूरचे आरोग्य संचालक डॉ. संजय मिश्रा (Dr Sanjay Mishra) म्हणाले, की जबलपूरमध्ये हा संसर्ग वेगाने पसरत असून, व्हायरल ताप (Viral Fever), सर्दी-खोकला किंवा चिकनगुनियाच्या रुग्णांमध्येही प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचं दिसत आहे. या तापाचा उगम माहिती नसल्याने त्याला मिस्ट्री फीव्हर (Mystery Fever) असं संबोधलं जात आहे. हे वाचा - "Work From Home बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल"; हर्ष गोयंकांना महिलेची विनंती; वाचून येईल हसू डेंग्यूच्या नव्या स्ट्रेनमुळे हे घडत असल्याची शंका सर्व डॉक्टर्सशी चर्चा केल्यानंतर पुढे आली आहे, असंही डॉ. मिश्रा यांनी सांगितलं. डेंग्यूच्या या संभाव्य नव्या स्ट्रेनचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे डेंग्यूचे रिपोर्ट निगेटिव्ह (Dengue Report Negative) येत आहेत; मात्र त्यांच्यात लक्षणं डेंग्यूचीच दिसत आहेत. कारण प्लेटलेट्स झपाट्याने घटत आहेत, असंही डॉ. मिश्रा म्हणाले. विशेषज्ञांच्या म्हणण्यानुसार, सर्वसामान्य निरोगी मनुष्याच्या रक्तातल्या प्लेटलेट्सचं (Normal Platelets) प्रमाण दीड लाख ते चार लाखांपर्यंत असतं. आता मात्र या अज्ञात प्रकारच्या तापामुळे प्लेटलेट्सचं प्रमाण झपाट्याने घटत असल्याचं आढळत आहे. त्यामुळे नवी शक्यता गृहीत धरून डॉक्टर्सकडून उपचार केले जात आहेत. प्लेटलेट्सचा संबंध शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीशी असतो. त्यामुळे प्लेटलेट्स घटल्यावर मोठे दुष्परिणाम होतात.
  First published: