दुधामधली भेसळ रोखण्यासाठी मोठा निर्णय, हा नवा नियम होणार लागू

दुधामधली भेसळ रोखण्यासाठी मोठा निर्णय, हा नवा नियम होणार लागू

देशभरामध्ये मे 2018 ते ऑक्टोबर 2018 या काळात दुधाचे नमुने गोळा करण्यात आले. यामध्ये 1103 शहरांमधल्या 6432 नमुन्यांचा समावेश होता. यामध्ये पिशवीतल्या दुधाची गुणवत्ता चांगली असेल, अशी अपेक्षा होती पण सुमारे 38 टक्के दुधामध्ये गुणवत्ता आढळली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : आपल्याकडे येणारं दूध शुद्ध असावं, यामध्ये कोणतीही भेसळ असू नये यासाठी अन्नसुरक्षा आणि अन्नाचा दर्जा ठरवणाऱ्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् अथॉरिटी ऑफ इंडिया ने एक नवा नियम काढला आहे.

मदर डेअरी, अमूल यासारख्या दूध कंपन्यांना आपल्या दुधाची चाचणी FSSAI च्या प्रयोगशाळेत करून घ्यावी लागेल. दुधामध्ये पाणी मिसळून ते विकलं जात असेल किंवा त्यात अन्य घटकांची भेसळ केली जात असेल तर ते रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील.दुधासोबतच तूप, पनीर या पदार्थांमध्येही भेसळीच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारंही यावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न करतायत.

(हेही वाचा : आता 4 लाखांतही तुम्ही सुरू करू शकता दुप्पट नफा देणारा 'हा' व्यवसाय)

दुधाचे नमुने केले गोळा

देशभरामध्ये मे 2018 ते ऑक्टोबर 2018 या काळात दुधाचे नमुने गोळा करण्यात आले. यामध्ये 1103 शहरांमधल्या 6432 नमुन्यांचा समावेश होता. यामध्ये पिशवीतल्या दुधाची गुणवत्ता चांगली असेल, अशी अपेक्षा होती पण सुमारे 38 टक्के दुधामध्ये गुणवत्ता आढळली नाही. यात फॅट्सचं प्रमाण कमी होतं. अर्थात हे दूध पिणं आरोग्यासाठी धोकादायक आहे, असा मात्र अर्थ होत नाही.

या दुधात पाणी मिसळलं जात असेल किंवा गायीला दिल्या जाणाऱ्या खाद्यामध्ये कमतरता असेल, असा अंदाज आहे. याच कारणांमुळे दुधाची नीट चाचणी घेतली जावी, असा नियम करण्यात आला आहे.

=====================================================================================

VIDEO : मुख्यमंत्र्यांना ग्वाही दिल्यानंतरही राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या