Network 18 आणि DIAGEOचा उपक्रम, 'मुलं जे बघतात तशीच घडतात'

Network 18 आणि  DIAGEOचा उपक्रम, 'मुलं जे बघतात तशीच घडतात'

Network 18 आणि DIAGEO यांनी पुढाकार घेतलाय. एक प्रोजेक्ट तयार केलंय. या प्रोजेक्टचं नाव आहे 'रोड टु सेफ्टी'.

  • Share this:

मुंबई, 29 मे : ड्रायव्हिंग करताना महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सुरक्षितता. तुम्ही हेल्मेट घातलं नाही तर तुमचं डोकं सुरक्षित राहणार नाही. सुरक्षित आणि सुखरूप असणं हे तुमचं प्राधान्य असतं. ठरलेल्या ठिकाणी अति जलद जाऊन यमदूतालाच गाठण्यापेक्षा तुमचं कुटुंब, तुम्ही स्वत: यांची जबाबदारी तुमच्यावर असते. तुमची तुमच्या स्वत:शी आणि कुटुंबाशी बांधिलकी असते. भारत सरकारही यालाच प्राधान्य देतं. म्हणूनच सरकारनं म्हटलंय, 'सडक सुरक्षा जीवनरक्षा' .

अनेक क्षेत्रातले मान्यवर सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी हाच संदेश पसरवत असतात. असाच पुढाकार Network 18 आणि  DIAGEO यांनी घेतलाय. या प्रोजेक्टचं नाव आहे 'रोड टु सेफ्टी'. हा प्रकल्पामागे 'तुम्ही जो उपदेश करता तो अमलात आणा,' ही संकल्पना आहे. शिवाय आत्मसात करण्याची छोट्या मुलांची उत्तम क्षमता आहे, ही संकल्पनाही आहे.

हे सत्य आहे की कुठल्याही प्रौढांपेक्षा मुलांचं रिकामं मन कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीनं आणि जलद आत्मसात करू शकतं. जाहिरातीत मुलांच्या याच गुणवत्तेचं कौतुक केलंय. हे मूल आपल्या व्यग्र पालकांना वाहतुकीचे नियम पाळायला सांगतं. मुलांवरचा सकारात्मक प्रभाव दर्शवते. सुरुवातीला जाहिरातीतून मुलाचा खरा स्वभाव समोर येतो. वडिलांचं निरीक्षण करणं आणि त्यांच्याकडून शिकणं. तसंच वागणं. म्हणूनच सीट बेल्ट न लावणं. ही फ्रेम काळी होते आणि संदेश येतो, ' मुलं जे बघतात तशीच घडतात'.  हा खरा संदेश आहे. शेवटी काय आपण जे बघत असतो, तेच शिकत असतो. जाहिरातीत पुढे शिकवणं आणि शिकणं यामुळे आपल्यालाच ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्यावर आणि समाजावर पडतो, असं दाखवलंय. ही जाहिरात वडील-मुलांच्या नात्याला अधोरेखित करतात.

या नात्याचा परिणाम इतरांवर होतो. एका वेळी अनेक घटना घडतात. हे सर्व ट्रॅफिक सिग्नलजवळ होतं. पुन्हा हे दृश्य अस्पष्ट होत संदेश येतो, ' मुलं जे बघतात तशीच घडतात'. एका निरागस वागण्यानं बऱ्याच घटना घडतात आणि प्रत्येकाचं मन बदलतं. तो व्हिडिओ पाहिला की तुम्हालाही हेच जाणवेल.

या जाहिरातीत संदेश स्पष्ट होण्यासाठी अनेक रंगछटांचा वापर केलाय. ही जाहिरात रस्ता सुरक्षा आणि नियम याबद्दलचा संदेश पोचवते.

रस्ता सुरक्षा म्हणजे स्वत:ची सुरक्षा. इतरांची नाही. शिवाय या व्हिडिओत हेही समोर येतं की मुलांना आपण जसं वाढवतो त्यानं समाजात बदल होऊ शकतो आणि जग हे राहण्यासाठी सुंदर ठिकाण बनतं. रस्ता सुरक्षेसाठी DIAGEO आणि Network18 नं घेतलेला पुढाकार हा समाजाला सकारात्मक आणि प्रभावी संदेश देतो. खालच्या लिंकवरचा व्हिडिओ पाहा आणि भारतीय रस्ता सुरक्षित ठेवण्याची शपथ घ्या.

First published: May 29, 2019, 12:52 PM IST
Tags: network 18

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading