चालक टॅक्सीत कंडोम ठेवतात, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, आता पुरे!

चालक टॅक्सीत कंडोम ठेवतात, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, आता पुरे!

पोलिसांना त्याने सर्व कागदपत्र दाखवली पण त्याने समाधान न झाल्याने पोलिसांनी त्याला त्याच्या गाडीतला फस्ट एड बॉक्स दाखवायला सांगितला. मात्र त्या बॉक्समध्ये कंडोम्स नाहीत असं कारण देत पोलिसांनी त्याला दंड केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : नवा मोटर व्हेईकल अॅक्ट (New Motor Vehicle Act)  लागू झाल्यानंतर पोलीस (Police) आणि वाहनचालकांच्या अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत. सोशल मीडियावरूनही अशा बातम्या आणि त्यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होताहेत. आता अशीच एक बातमी दिल्लीची आहे. ती वाचून सगळ्यांनाच धक्का बसेल. टॅक्सीचालकाच्या (Cab) फर्स्ट एड बॉक्समध्ये(First aid Box) कंडोम (Condom) नसल्याने पोलिसांनी दंड केल्याची तक्रार टॅक्सी चालकाने केलीय. पोलिसांनी हा दंड केल्यामुळे टॅक्सीचालकालाही धक्का बसला. ड्रायव्हरकडे लायन्स नसेल, पीयुसी नसेल, विमान नसेल, त्याने वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं असेल तर दंड झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत मात्र हे प्रकरण जरा वेगळच असल्याने त्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होतेय.

...तर महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनते समोर फाशी घेईन - धनंजय मुंडे

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. टॅक्सीतल्या फस्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवण्याचा कुठलाही नियम नाही. मात्र किमान तीन कंडोम ठेवणं आवश्यक असल्याचं टॅक्सी चालक संघटनेचं मत आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्लीतल्या नेल्सन मंडेला मार्गावर वाहतूक पोलिसांनी एका टॅक्सी ड्रायव्हरला पकडलं. धर्मेंद्र असं त्या ड्रायव्हरचं नाव होतं. पोलिसांना त्याने सर्व कागदपत्र दाखवली पण त्याने समाधान न झाल्याने पोलिसांनी त्याला त्याच्या गाडीतला फस्ट एड बॉक्स दाखवायला सांगितला. धर्मेंद्रने तोही त्याला दाखवला. मात्र त्या बॉक्समध्ये कंडोम्स नाहीत असं कारण देत पोलिसांनी त्याला दंड केला. मात्र त्याच्या घरी जेव्हा पावती आली तेव्हा त्यात कंडोमचा उल्लेख नव्हता तर वेगानं गाडी चालवण्याचा उल्लेख होता.

'राज ठाकरेंनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरावं हीच कार्यकर्त्यांची इच्छा'

दिल्लीतल्या सर्वोदय ड्रायव्हवर असोसिएशनचे अध्यक्ष कमलजीत गिल यांच्या मतानुसार प्रत्येक ड्रायव्हरला फस्ट एड बॉक्समध्ये तीन कंडोम ठेवणं गरजेचं आहे. मात्र ही माहिती अनेक चालकांना नाही. कुणी जखमी झालं तर रक्त प्रवाह थांबविण्यासाठी कंडोमचा उपयोग केला जातो असं त्यांचं मत आहे.

अपघातात फ्रॅक्चर झाल्यास किंवा कापल्यास  हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत बांधण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र नियमांमध्ये कंडोमचा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चर्चेचा विषय बनलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 08:08 PM IST

ताज्या बातम्या